टोळीने गुन्हे करणाऱ्या २७ सराईतांवर मोक्‍का; प्रथमच ३ अल्‍पवयीनांचा समावेश

deepak_pandey
deepak_pandey

नाशिक : नाशिक रोड आणि उपनगर भागात संघटित टोळी बनवून गंभीर गुन्‍हे करणाऱ्या २७ सराईतांवर नाशिक शहर पोलिसांनी मोक्‍कांतर्गत कारवाई केली व ११ जणांना अटक केली. यात तीन अल्‍पवयीन संशयितांचा समावेश आहे. २०हून अधिक टवाळखोरांसह प्रथमच तीन अल्‍पवयीन संशयितांवर मोक्‍कांतर्गत कारवाई झाली आहे. 

 पोलिस आयुक्तांचे मोक्कांतर्गत आदेश

उपनगर पोलिस ठाण्याच्‍या हद्दीत १६ नोव्हेंबर २०२० ला टोळीने योगेश पन्नालाल चायल (२३, रा. देवळाली गाव) याचा खून केला होता. तपासात मारेकऱ्यांनी टोळी बनवून संघटितपणे खून केल्याचे उघडकीस आले होते. या टोळीने पैसांसाठी अवैध मार्गाचा वापर, गुन्हेगारी कृत्यात कोणत्याही थराला जाण्याची तयारी, दहशत पसरवण्याचा प्रयत्‍न सुरू होता. महिला, व्यावसायिकांच्या मनातही भिती निर्माण केली जात असल्‍याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख, उपनगरचे निरीक्षक अनिल शिंदे यांनी २७ जणांवर मोक्काचा प्रस्ताव ठेवला. त्यास मंजुरी दिली असून, त्यातील ११ जणांना अटक केली आहे. अन्‍य तिघे अल्‍पवयीन असून, त्‍यांना ताब्‍यात घेतले. १३ संशयित फरारी असून, त्‍यांचा शोध सुरू आहे. या टोळीत काही संशयित गुन्ह्यात थेट सहभागी होते, तर काहींनी गुन्हेगारांना मदत केल्याचे उघडकीस आले. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, असा विश्र्वास पोलिसांनी व्‍यक्‍त केला. 

कारवाई झालेल्‍या सराईतांची नावे 

टोळीप्रमुख सागर म्हस्के ऊर्फ सानू पाईकराव (वय २२), रोहित लोंढे ऊर्फ भुऱ्या (२१), जय ऊर्फ मारुती घोरपडे (१८), राहुल तेलोरे ऊर्फ भांडा (१९), कलाम सलीम राईन (१९), सत्तू राजपूत (२०), हर्ष म्हस्के ऊर्फ टोनू पाईकराव, जॉन पडेची (२८), योगेश बोडके (२३), साहिल म्हस्के ऊर्फ मोनू पाईकराव (२०), अमन वर्मा ऊर्फ मामा (३५) यांना अटक केली, तर अक्षय पारचे (२१), संदीप सुंदरलाल ऊर्फ बाबू मनियार (२३), अजय लोहट ऊर्फ अज्जू मामा, विजय बहेनवाल ऊर्फ छंगा, अनुज बहेनवाल, शिबान शेख, गोलू, बॉबी, विनोद, आतिष या नाशिकच्या संशयितांसह उल्हासनगर येथील पप्पू वाघ, चेतन वाघ, कल्याण येथील नासीर यांच्यासह तीन अल्पवयीन संशयितांवर मोक्कानुसार कारवाई केली. 

शहरातून येत्‍या तीन महिन्‍यांत संघटित टोळ्या हद्दपार केल्‍या जातील. गुन्‍हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. टवाळखोरांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल. 
-दीपक पाण्डेय , पोलिस आयुक्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com