अहो साहेब!...'स्मार्ट रोडचे भाग्य आम्हाला लाभणार तरी कधी?'

smart road.jpg
smart road.jpg

नाशिक : मोठा गाजावाजा करत स्मार्टसिटी अंतर्गत सुरू केलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानचा 1.1 किलोमीटर स्मार्ट रस्ता अंतिम टप्प्यात असला तरी त्या रस्त्याचे रडगाणे अद्यापही संपता संपत नसल्याने नाशिककरांना मनस्ताप होत आहे. कधी एकदाचा रस्ता तयार होऊन मार्ग सुकर होईल, या प्रतीक्षेत नाशिककर आहेत. 

मानसिक ताण पैशात भरून न निघणारा

स्मार्टसिटी अंतर्गत जानेवारी 2018 मध्ये रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. प्रत्य क्षात मार्चमध्ये कामाला सुरवात झाली. सहा महिन्यांत रस्ता तयार होणे अपेक्षित अस तांना पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही रस्ता पूर्ण न झाल्याने आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली. स्मार्ट रस्ता वेळेत तयार होणार नाही ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर एप्रिलपासून प्रतिदिन 41 हजार रुपये दंड आका रणी सुरू झाली. स्मार्टसिटी कंपनीकडून प्रतिदिन दंडात्मक आकारणी होत असली तरी नाशिककरांना होत असलेला मानसिक ताण पैशात भरून निघणारा नसल्याची टीका व्यापारी वर्ग करत आहे. 

बहुधा स्मार्ट रस्ता नाशिककरांसाठी एक अख्यायिका बनणार

ज्या भागात स्मार्ट रस्ता तयार केला जात आहे. त्या भागात जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय कन्या शाळा, बिटको महाविद्यालय, गोळे कॉलनीमध्ये मेडिकलची दुकाने, महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, पंचवटी भागाकडे जाणारे प्रमुख रस्ते व मुख्य बाजारपेठ या प्रकारच्या मोठ्या आस्थापना आहेत. रस्त्याच्या कामामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. स्मार्ट रस्त्याचे काम सुरू असतानाही छोटे अपघात, शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पोहचतांना पडलेला मोठा फेरफटका यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत रस्ता खुला करण्याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु, त्या स्मार्ट रस्त्यावरून फक्त वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अद्यापही कामे अपूर्ण असल्याने स्मार्टसिटीअंतर्गत तयार होत असलेला स्मार्ट रस्ता नाशिककरांसाठी एक अख्यायिका बनणार असल्याचे दिसून येत आहे. 

स्मार्ट रस्त्याचे अपूर्ण काम
 
- 27 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अद्यापही सुरू 
- अवघे चार कॅमेरे कार्यान्वित 
- पब्लिक ऍड्रेस सिस्टिम एन्व्हायरमेंट सेन्सरचे काम अपूर्ण 
- इंटिग्रेटेड ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टिम अपूर्ण 
- सीबीएस, मेहेर, अशोक स्तंभ जंक्‍शनवर अद्यापही कामे सुरू 
- नागरिकांना सूचना देणारे पब्लिक ऍड्रेस सिस्टिम नाही 
- पावसाचे पाणी वाहून नेताना अडथळे 
- रस्त्यावरून वाहन चालविताना रोलर कोस्टरचा अनुभव 
- पथदीपांचे काम अपूर्ण 
- फुटपाथचा वापर नाही 
- सायकल ट्रॅकचे काम अपूर्ण 
- सीबीएस जंक्‍शनवर डावीकडील वळणावर रिक्षा स्टॅन्ड

मेन रोड इमारतीची पुनरावृत्ती 

पालिका असताना मेन रोड येथे दगडी इमारत तयार करण्यात आली होती. परंतु, त्या वेळी इमारत तयार करताना झालेला विलंब, कामे अपूर्ण राहिल्याने संबंधित मक्ते दाराला त्याकाळी एक रुपया दंड आकारण्यात आला होता. त्याचप्रमाणे स्मार्ट रस्त्यावर आकारण्यात आलेला दंड आता लाखो रुपयांच्या घरात गेल्याने हा रस्तादेखील मेन रोडच्या दगडी इमारतीप्रमाणे कायम चर्चेत राहणारा विषय आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com