#fightagainstcorona : नाशिकची मृणाल गुंजाळ न डगमगता जॉर्जियामध्ये अभियंता म्हणून सक्रिय 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 26 मार्च 2020

नाशिकच्या बॉशमध्ये मृणालचे वडील आहेत. तिची आई गृहिणी आहे, तर तिचा एक भाऊ आणि एक बहीणही अभियांत्रिकीचे नाशिकमध्ये शिक्षण घेत आहेत. बुधवारी (ता.25) रात्री दहा (म्हणजे, जॉर्जियातील दुपारी साडेबाराला) मृणालने व्हिडिओ कॉलद्वारे "सकाळ'शी संवाद साधला. मातृभूमीसह भारतात "लॉकडाउन'च्या घेतलेल्या निर्णयाबद्दल तिने आनंदभाव व्यक्त केला. मृणाल म्हणाली, की कोरोनाचे अकराशे रुग्ण आणि 55 हजार संशयित, तर एका दिवसात 163 जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील, म्हणून अद्याप "लॉकडाउन' झालेले नाही.

नाशिक : येथील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी मिळाविल्यानंतर अबुर्न विद्यापीठातून मृणाल गुंजाळने पदव्युत्तर पदवी घेतली. चार वर्षांपासून ती जॉर्जियामध्ये कारच्या सीट बनवणाऱ्या कंपनीत मॅन्युफॅक्‍चर इंजिनिअर म्हणून करिअर करीत आहे. अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले असताना, ती न डगमगता कंपनीत जाऊन काम करीत आहे. 

मातृभूमीतील "लॉकडाउन'बद्दल आनंदभाव 
नाशिकच्या बॉशमध्ये मृणालचे वडील आहेत. तिची आई गृहिणी आहे, तर तिचा एक भाऊ आणि एक बहीणही अभियांत्रिकीचे नाशिकमध्ये शिक्षण घेत आहेत. बुधवारी (ता.25) रात्री दहा (म्हणजे, जॉर्जियातील दुपारी साडेबाराला) मृणालने व्हिडिओ कॉलद्वारे "सकाळ'शी संवाद साधला. मातृभूमीसह भारतात "लॉकडाउन'च्या घेतलेल्या निर्णयाबद्दल तिने आनंदभाव व्यक्त केला. मृणाल म्हणाली, की कोरोनाचे अकराशे रुग्ण आणि 55 हजार संशयित, तर एका दिवसात 163 जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील, म्हणून अद्याप "लॉकडाउन' झालेले नाही. आम्ही कंपनीत कामावर जाताना सॅनिटायझरचा वापर करतो. कामाच्या ठिकाणचा पृष्ठभाग स्वच्छ केला जातो. मात्र मास्क वापरू दिले जात नाही. एखाद्याने मास्क वापरल्यावर त्यास घरी पाठवण्यात येते. कंपनीतील चारशे जणांपैकी आम्ही दोघे भारतीय आहोत. दुसरे भारतीय मात्र जॉर्जियाचे रहिवासी आहेत. 

हेही वाचा >"घरात कंटाळा येतोय.. विनाकारण घराबाहेर पडायचयं? तर घ्या मग पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा!"....सोशल मिडीयावर व्हायरल​
 
कामावर न जाण्याचा कुटुंबीयांचा सल्ला 

चीन, इटलीपाठोपाठ अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याने कुटुंबीयांकडून कामावर न जाण्याचा सल्ला सातत्याने दिला जातो, पण नोकरी करायची असल्याने "वर्क फॉर होम' करणे शक्‍य नाही. कंपनीत कामावर जाताना तापमान मोजले जाते. तसेच एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले जाते. ही सारी परिस्थिती पाहता, पुढील आठवड्यापासून मी सुटी घेण्याचे ठरवले आहे, असे मृणालने सांगितले. 

हेही वाचा > COVID-19 : 'शहराने पैसे कमवायला शिकवलं अन् गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला!'...नोकरदार गावाकडे परतले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik's Mrunal gunjal active as an engineer in Georgia without hesitation nashik marathi news