नाशिककर विदित करणार "चेस ऑलिंपियाड' मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जुलै 2020

बुद्धिबळ म्हटले, की सर्वप्रथम विश्‍वनाथन आनंदच आठवतो, एवढा त्याचा या क्षेत्रात दबदबा आहे. असे असतानाही त्याचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकचा बुद्धिबळपटू व देशातील क्रमांक दोनचा ग्रॅंडमास्टर असलेल्या विदितकडे देण्यात आले आहे.

नाशिक : ऑल इंडिया चेस फेडरेशनतर्फे येत्या 22 जुलैला होणाऱ्या ऑनलाइन चेस ऑलिंपियाड-2020 स्पर्धेत नाशिकचा विदित गुजराथी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे, बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भारताला जगात नावलौकिक मिळवून देणारा माजी विश्‍वविजेता विश्‍वनाथन आनंद आणि अन्य दिग्गज बुद्धिबळपटूंचा समावेश या संघात असल्याने नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. 

"चेस ऑलिंपियाड'मध्ये विश्‍वनाथन आनंदसह दिग्गज खेळाडूंचा समावेश
बुद्धिबळ म्हटले, की सर्वप्रथम विश्‍वनाथन आनंदच आठवतो, एवढा त्याचा या क्षेत्रात दबदबा आहे. असे असतानाही त्याचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकचा बुद्धिबळपटू व देशातील क्रमांक दोनचा ग्रॅंडमास्टर असलेल्या विदितकडे देण्यात आले आहे. विदितचे नामांकन केल्यानंतर ऑनलाइन चेस ऑलिंपियाड-2020 साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली. या संदर्भात विश्‍वनाथन आनंद आणि ऑल इंडिया चेस फेडरेशनचे अध्यक्ष पी. आर. व्यंकटरामा राजा यांच्यात झालेल्या चर्चेनंतर विदितच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. भारतीय संघात विश्‍वनाथन आनंदसह पी. हरिकृष्णा आणि राष्ट्रीय चॅंपियन अरविंद चिदंबरम, वर्ल्ड रॅपिड चॅंपियन कोनेरू हम्पी, डी. हरिका आदी दिग्गजांचा समावेश आहे. अशा संघाचे नेतृत्व विदित करणार असल्याने ती नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. 

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

असा आहे भारतीय संघ 
पुरुष : विश्‍वनाथन आनंद, विदित गुजराथी (कप्तान), पी. हरिकृष्णा, अरविंद चिदंबरम (राखीव). 
महिला : कोनेरू हम्पी, द्रोनावल्ली हरिका, भक्‍ती कुलकर्णी, आर. वैशाली (राखीव). 
कनिष्ठ गट मुले : निहाल सरीन, आर. प्रज्ञानंदा (राखीव). 
कनिष्ठ गट मुली : दिव्या देशमुख, अवंतिका अग्रवाल (राखीव). 

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!

नाशिककर विदितकडे भारतीय संघाचे नेतृत्व  
विदित प्रचंड मेहनती असून, त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी तो यशस्वीरीत्या पार पाडेल, असा विश्‍वास आहे. विश्‍वनाथन आनंदने विचारपूर्वक त्याचे नाव सुचविले असून, विदितमधील क्षमता त्यानेही ओळखल्या आहेत. स्पर्धेच्या तयारीसाठी त्याने नियोजन आखले असून, चांगल्या कामगिरीची खात्री आहे. -डॉ. निकिता गुजराथी, विदितची आई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik,s Vidit leads Indian team in "Chess Olympiad"nashik marathi news