अवकाळीनंतर कांद्याचे दर वधारले! आवक घटल्याने ओलांडला चार हजारांचा टप्पा 

news about onion prices in lasalgaoan nashik marathi news
news about onion prices in lasalgaoan nashik marathi news

लासलगाव(जि. नाशिक) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल व उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा होऊन कांद्याने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाचा फटका बसल्याने उशिरा येणाऱ्या खरीप कांद्याचे मोठे नुकसान झाले. मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीसाठी येणाऱ्या लाल कांद्याच्या आवकेत ५० टक्के घट झाल्याने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. निर्यात खुली असल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा देशांतर्गत पुरवठा घटला. याचा थेट परिणाम दरवाढ होण्यात झाला. 

शेतकऱ्यांना फायदा नाही...

कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटाचा सामना कांदा उत्पादकांना नेहमीच करावा लागतो. फेब्रुवारी २०२० मध्ये आठ लाख ४० हजार ५५५ क्विंटल आवक झाली होती. त्यात कमीत कमी ८००, जास्तीत जास्त दोन हजार ८४७, तर सरासरी एक हजार ९३० रुपये क्विंटल दर होते. तर फेब्रुवारी २०२१ मध्ये तीन लाख सात हजार ९३८ क्विंटल आवक झाली. कमीत कमी ८००, जास्तीत जास्त चार हजार ५००, तर सरासरी तीन हजार ५१६ रुपये क्विंटल दर आहे. गेल्या आठवड्यात राज्यात अवकाळीने पुन्हा तडाखा दिल्याने उन्हाळ कांद्याच्या आवकेवर परिणाम झाला. त्यामुळे दरात सुधारणा होत आहे. या दरवाढीचा फायदा कांदा उत्पादकांना होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामधून उत्पादन खर्चही निघू शकत नाही. 

कांदा दरात आज जरी सुधारणा दिसत असली तरी ही सुधारणा दीर्घकाळ टिकणारी नाही. उन्हाळ कांद्याची आवक येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे वाढलेल्या कांद्याचे दर कमी होण्यास मदत होईल. 
-नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती 


फेब्रुवारी महिन्यात दरात सुधारणा (लाल कांदा) 
तारीख आवक दर (कमीत कमी) दर (जास्तीत जास्त) 
१ फेब्रुवारी २७,९२७ १,१५१ ३,६८१ 
६ फेब्रुवारी १३,१८९ १,१०१ ३,१३० 
१६ फेब्रुवारी ११,४६४ १,५०० ४,०९१ 
१७ फेब्रुवारी ८,९२१ १,५०० ४,५०० 
२२ फेब्रुवारी ७,१९० ८०० ४,३७५ 

फेब्रुवारी महिन्यात दरात सुधारणा (लाल कांदा) 
तारीख आवक दर (कमीत कमी) दर (जास्तीत जास्त) 
१६ फेब्रुवारी ४९० २,००१ ४,०११ 
१७ फेब्रुवारी ९७३ १,६०० ४,११२ 
२२ फेब्रुवारी ३०० २,००० ४,१०१  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com