जागतिक स्तनपान सप्ताह : मातेच्‍या दुधात दहा लाख पांढऱ्या पेशी तयार करण्याची क्षमता 

breast-feeding_.jpg
breast-feeding_.jpg

नाशिक : सर्वगुणसंपन्न मानल्या जा‍णाऱ्या मातेच्या दुधाला बाळाच्या सुदृढतेसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातेचे दूध पिणारी मुले कमी आजारी पडतात. कारण मातेच्या दुधात दहा लाखांपेक्षा जास्त पांढऱ्या पेशी तयार करण्याची क्षमता असून, बाळाचे पहिले लसीकरण म्हणजे चिक दुधाचे सेवन होय, अशी माहिती स्‍तनपान विशेषज्ञ डॉ. रूपल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. अग्रवाल : कोरोना काळात मातेच्‍या दुधाचे महत्त्व अधिक 

सध्याच्‍या कोरोना काळात बाळाच्‍या वाढीसाठी मातेच्‍या दुधाला महत्त्व असून, सावधगिरी बाळगणे आवश्‍यक असल्‍याचे नमूद केले. १ ते ७ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ. अग्रवाल यांनी माहिती दिली. त्‍या म्‍हणाल्‍या, की जन्‍मानंतर स्तनपान जेवढ्या लवकर सुरू होईल, तेवढ्या लवकर आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतात. स्तनपान करताना हवादेखील पोटात जात असल्‍याने, स्‍तनपान झाल्यावर बाळाला ढेकर देण्यास मदत करावी. बाळ दिवसातून सहा ते आठ वेळा व्यवस्थित लघवी करीत असेल आणि त्याचे वजन व्यवस्थित चार्टप्रमाणे वाढत असेल, तर त्याला मातेचे दूध पुरते असे समजावे.  

रिपोर्ट - अरुण मलाणी

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com