चिंताजनक! नाशिक जिल्ह्यात आणखी नऊ कोरोनाबाधित..एक वृद्ध महिला वगळता सर्व मालेगावमधील 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 17 April 2020

नाशिकच्या अंबड परिसरातील संजीवनगरमध्ये 63 वर्षीय वृद्ध महिलेचा व मालेगाव येथून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍन्जीओप्लास्टीसाठी आलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सायंकाळी 65 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला असतानाच, रात्री उशिरा मालेगाव येथील आणखी सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (ता.16) पुन्हा नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांची संख्या आता 55 वर पोचली आहे. यात गुरुवारी सकाळी आढळलेल्या दोन रुग्णांचा व सायंकाळी प्राप्त झालेल्या मालेगाव येथील सात रुग्णांच्या अहवालाचा समावेश आहे.

अंबडची वृद्ध महिला वगळता सर्व मालेगावमधील 

नाशिकच्या अंबड परिसरातील संजीवनगरमध्ये 63 वर्षीय वृद्ध महिलेचा व मालेगाव येथून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍन्जीओप्लास्टीसाठी आलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सायंकाळी 65 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला असतानाच, रात्री उशिरा मालेगाव येथील आणखी सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. गुरुवारी सायंकाळी कोरोना संशयितांचे 65 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात 54 रिपोर्ट नाशिक शहरातील, तर 11 रिपोर्ट उर्वरित जिल्ह्यातील आहेत. 65 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला असला, तरी अद्याप 230 रिपोर्ट प्रलंबित आहेत. 

 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

कोरोनाबाधितांची सद्यःस्थिती 
* जिल्हा रुग्णालय : 7 
* नाशिक महापालिका रुग्णालय : 2 
* मालेगाव : 46 
* एकूण : 55 
* उपचार सुरू : 53 
* मृत 1 
* कोरोनामुक्त : 1  

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine more corona patient in Nashik district marathi news