मांसाहारी खवय्यांनो...दोन महिन्यांपूर्वी कुणी फुकटही घेत नसलेल्या चिकन-मटणचे भाव कळले का?

chicken curry.jpg
chicken curry.jpg

मटणाबरोबर चिकनही महागले 
जनावरांचा बाजार बंद, तर पोल्ट्री उत्पादनात घटीचा परिणाम 
सकाळ वृत्तसेवा 
नाशिक / पिंपळगाव बसवंत :
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात जनावरांचे बाजार बंद असल्याचा फटका मटण विक्रेत्यांना बसल्याने त्यांच्याकडून आणि दोन महिन्यांपूर्वी कुणी फुकटही घेत नसलेल्या चिकनचाही भाव आता कडक उन्हातही चांगलाच वधारला आहे.

कडक उन्हात भाव चांगलाच वधारला

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी केल्यापासून मटणप्रेमींची अडचण होऊन बसली आहे. लॉकडाउनपूर्वी चिकनबाबत अफवा पसरल्यामुळे चिकन सेंटरवाल्यांना अक्षरश: 20 रुपये किलोपर्यंत चिकन विकावे लागले. काही ठिकाणी तर फुकट कोंबड्या वाटण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यात तर अक्षरश: रांगा लावून मटण खरेदी करावे लागले. लॉकडाउनपूर्वी मटणाचा दर 540 ते 560 रुपये इतका होता. लॉकडाउनमध्ये मटण व चिकन विक्रीची दुकानेही बंद झाली. मात्र ग्रामीण भागात मटण विक्री चोरी-छुपी सुरू होतीच. काही ठिकाणी सकाळी लवकर बोकड कापून मटणाचे वाटे तयार करून विकले जाऊ लागले. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मांस विक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यामुळे मटण व चिकन विक्री सुरू झाली आहे. परंतु जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे मटण विक्रेत्यांना तुटवडा भासू लागला आहे. सध्या जादा दराने त्यांना माल मिळत असल्यामुळे तेसुद्धा अधिक दराने मटण-चिकन विक्री करीत आहेत. 

असा आहे भाव

अफवांच्या बाजारात अक्षरश: खिमा झालेल्या चिकनचा ऐन उन्हाळ्यात 240 रुपये, तर बोकडाच्या मटणाचा भाव 700 ते 800 रुपये किलोंपर्यंत पोचला आहे. न परवडणारे मटणाचे भाव व चिकनबाबत अफवांचा बाजार थंडावल्याने खवय्यांनी चिकनला पसंती दिली खरी मात्र उन्हाळ्यात उतरणाऱ्या चिकनच्या दराने उसळी घेतल्याने बेरोजगारीसह अर्ध्या पगारात खर्च भागवणाऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. 

मटणाऐवजी चिकनला पसंती 
मटणाला पर्याय म्हणून अनेक जण चिकनला पसंती देतात, परंतु लॉकडाउनपूर्वी पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागला. अनेकांनी पोल्ट्रीच्या बॅच काढल्या नाहीत. त्यामुळे बाजारात अचानक चिकनचा तुटवडा भासू लागला होता. सध्या मटण दरवाढीमुळे चिकनला मागणी वाढली आहे. त्यामुळे चिकनचा भाव वाढविला आहे. लॉकडाउनपूर्वी चिकनचा दर 160 ते 180 रुपये होता. तो दर काही दिवसांपूर्वी दोनशे रुपयांवर पोचला. सध्या 240 रुपये दराने चिकनची विक्री नाशिक जिल्ह्यात सुरू आहे, तर बोकडही जागेवर सहाशे रुपये किलोने विकत घ्यावा लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com