वृध्द आई-वडिलांना घरी ठेवत शेतात गेलेली मुलं परतताच धक्का! परिसरात भीतीचे वातावरण

दिपक घायाळ
Monday, 11 January 2021

वृध्द दाम्पत्य घरात एकटेच होते. त्यांची दोन मुले शेतात राहतात. सकाळी वडिलांना उठविण्यास गेले असता मुलांच्या हा प्रकार लक्षात आला.  या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विंचूर (जि.नाशिक) : वृध्द दाम्पत्य घरात एकटेच होते. त्यांची दोन मुले शेतात राहतात. सकाळी वडिलांना उठविण्यास गेले असता मुलांच्या हा प्रकार लक्षात आला.  या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथील घटना 

येवला रस्त्यालगतच जगताप यांचे घर आहे. शनिवारी (ता.९) रात्री दोनच्या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे जोडपे घरात एकटेच होते. त्यांची दोन मुले शेतात राहतात. सकाळी वडिलांना उठविण्यास गेले असता मुलांच्या हा प्रकार लक्षात आला. जखमी अलका यांच्या जबाबानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे. पोलिस घरफोडी की खून, या दिशेने तपास करीत आहे. याप्रकरणी डीवायएसपी सोमनाथ तांबे, पोलिस निरीक्षक रंगराव सानप, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ तपास करीत आहे.  

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

पोलिसांसमोर आव्हान

विंचूर जवळच असलेल्या भरवस फाटा येथे रात्री दोनच्या सुमारास पडलेल्या दरोड्यात कारभारी जगताप (वय ६९) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी अलका गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An old man dies in a robbery niphad nashik marathi news