esakal | "आजी..आम्ही पोलिस आहोत..दिवसा सोने नका घालू" हातचलाखी करत तोतया पोलीसांनी वृद्धेची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

old mother.jpg

"आजी..आम्ही पोलिस आहोत, दिवसा गळ्यात असे सोने घालून बसू नका.. चोरटे चोरून नेतील.." असा सल्ला देणाऱ्या तोतया पोलिसांनी कशी हातचालाखी केली..अन् वृध्देला कसा घातला गंडा..वाचा सविस्तर.. ​

"आजी..आम्ही पोलिस आहोत..दिवसा सोने नका घालू" हातचलाखी करत तोतया पोलीसांनी वृद्धेची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / ओझर : "आजी..आम्ही पोलिस आहोत, दिवसा गळ्यात असे सोने घालून बसू नका.. चोरटे चोरून नेतील.." असा सल्ला देणाऱ्या तोतया पोलिसांनी कशी हातचालाखी केली..अन् वृध्देला कसा घातला गंडा..वाचा सविस्तर.. 

कसा घातला गंडा...
सोमवारी (ता. 6) ओझर गावातील मुंबई- आग्रा महामार्गावरील पोद्दार स्कूलजवळील सर्व्हिस रोडलगत असलेल्या नंदाबाई नवघिरे (रा. दहावा मैल) यांचे गोळ्या-बिस्किटचे दुकान असून दुपारच्या सुमारास त्यांच्या टपरीजवळ मोटारसायकलवरून दोघे थांबत त्यांनी रस्त्याने जात असलेल्या एका इसमास थांबवित अरे भरदिवसा गळ्यात सोन्याची चैन घालून फिरतो आहे. चोरून नेईल ना कोणी असे सांगून आम्ही पोलिस आहोत ती चैन काढून खिशात ठेव असे सांगितले. यावेळी त्या इसमाने तातडीने गळ्यातील चैन खिशात घातली. यानंतर दोघा तोतया पोलिसांनी टपरीवर जात नंदाबाई नवघिरे यांनी देखील आम्ही पोलिस आहोत. दिवसा गळ्यात असे सोने घालून बसू नका असे सांगून गळ्यातील सोन्याचे दागिने कागदामध्ये बांधून ठेवण्यास सांगितले. यावरून नंदाबाई त्या तोतया पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे कागद घेत गळ्यातील दोन सोन्याच्या पोत काढून त्या कागदामध्ये बांधून ठेवण्याकरीता पोलिसांच्या हातात दिल्या. पोलिसांनी यावेळी नंदाबाई नवघिरे यांचे लक्ष बोलण्यात गुंतवून ठेवत हातचालाखीने सोने काढून घेत कागदामध्ये दगड भरून ते पॅक करत नंदाबाई यांना दिले आणि टपरीवरून निघून गेले.

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
मात्र यावेळी जाताना या दोघा संशयित यांच्याबरोबर ज्या इसमास पोलिसांनी सोन्याची चैन खिशात ठेवण्यास सांगितले. तो देखील या पोलिसांबरोबर मोटारसायकलवर बसून गेल्याने नंदाबाई यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने कागदची पुढी खोलली असता त्यात त्यांना दगड ठेवल्याचे दिसले. आपल्याला फसविल्याचे लक्षता येताच नंदाबाई यांनी आराडाओरड केली मात्र तोपर्यंत तोतया पोलिस पळून जाण्यात यशस्वी झाले.या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर