दिलासादायक! जिल्ह्यात प्रथमच दिवसात दीड हजारावर रुग्ण कोरोनामुक्त; नवे १ हजार ३१७ बाधित  

one and a half thousand patients are corona free in a day nashik marathi news
one and a half thousand patients are corona free in a day nashik marathi news

नाशिक : काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पंधराशेचा आकडा ओलांडत असताना, सोमवारी (ता. १४) मात्र याउलट चित्र बघायला मिळाले. प्रथमच जिल्ह्यातील कोरोनामुक्‍तांच्‍या एका दिवसातील संख्येने पंधराशेचा टप्पा ओलांडला. दिवसभरात नव्‍याने एक हजार ३१७ नवीन बाधित आढळून आले. तर एक हजार ५८९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, नऊ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

सोमवारी कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये सर्वाधिक एक हजार २१९ रुग्‍ण नाशिक शहरातील, तर ग्रामीणमधील ३१३, मालेगावचे ४६, तर जिल्‍हाबाह्य दोन रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ८७६, नाशिक ग्रामीणचे ३७३, मालेगावचे ४८, जिल्‍हाबाह्य वीस रुग्ण आहेत. तर नऊ मृतांमध्ये नाशिक शहरातील पाच, नाशिक ग्रामीणचे तीन, मालेगाव महापालिका हद्दीतील एका रुग्‍णाचा समावेश आहे. दरम्‍यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४ हजार ८३३ वर पोचली आहे. त्‍यापैकी ४३ हजार २१४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. एक हजार ०७३ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. तर सद्यःस्‍थितीत दहा हजार ५४६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

४६० रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित

दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ४५३, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३११, मालेगाव रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३९, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय २८, जिल्‍हा रुग्‍णालयात चार संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ४६० रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी एक हजार २१ रुग्‍ण ग्रामीण भागातील आहेत. 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com