वैद्यकीय पथकाला जरी दिला गुंगारा... तरीही मृत्यूने गाठलेच...काय घडले वाचा..!

corona fear.gif
corona fear.gif

नाशिक : संबंधित रुग्णास कुठल्याही प्रकारची लक्षणे नव्हती; परंतु कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने चाचणीसाठी नेले जात होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. काय घडले वाचा...

काय घडले नेमके?

संबंधित रुग्णास कुठल्याही प्रकारची लक्षणे नव्हती; परंतु कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने चाचणीसाठी नेले जात होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोधून कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात दाखल केले जात आहे. तेथे तपासणी करून स्वॅबचे नमुने घेतले जातात. वडाळा नाका येथील अशाच एका 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील संशयितास शनिवारी (ता. 4) समाजकल्याण वसतिगृहातील केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. संबंधितास कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. रविवारी (ता. 5) त्यांचा स्वॅब घेण्यात येणार होता. दरम्यान, त्याने आपल्याला खासगी रुग्णालयात जायचे असल्याचे सांगितले. परंतु रुग्णालयाचा तपशील मात्र सांगितला नाही. डॉक्‍टरांनी त्याला विविध पर्याय सुचविले. समुपदेशनानंतर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात किंवा त्यांच्या आवडत्या अन्य रुग्णालयात पाठविण्यासाठी रुग्णवाहिकेत बसविले. रुग्णवाहिका सुरू होत असतानाच संबंधित दरवाजा उघडून पळ काढत, स्वतःच्या मोटारसायकलला किक मारून पळून जाऊ लागला. मात्र, त्याच वेळी हृदयविकाराचा तीव्र त्रास होऊन ते जागीच कोसळले. डॉक्‍टरांनी त्यांना रुग्णवाहिकेतून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात नेले असता, तपासून मृत घोषित करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छतेदन केले जाणार आहे. 

अखेर मृत्यूने गाठलेच

स्वॅब तपासणीसाठी नेत असलेल्या वैद्यकीय पथकाला गुंगारा देत, रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडून एका संशयित रुग्णाने पळ काढला खरा; पण दुचाकीवर धूम ठोकत असतानाच त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा धक्‍कादायक प्रकार सोमवारी येथे उघडकीस आला. 

घाबरू नका... 
कोरोना संशयित किंवा बाधित असलेल्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कोरोना आजार बरा होतो आणि मृत्यू झालेल्यांमध्येही आजपर्यंतच्या निरीक्षणानुसार समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे, केवळ भीतीपोटी रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. डॉक्‍टर व आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून रुग्णांसाठी अहोरात्र काम करीत आहेत; परंतु संशयित रुग्णांचा अथवा बाधित रुग्णांचा केवळ भीती व घबराटीमुळे मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. कुणीही कोरोनाची भीती बाळगू नये, मात्र नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com