नाशिकच्या शहर बससेवेतील एक अडथळा दूर; बससेवेला दिवाळीत मुहूर्त लागणार? वाचा

one obstacle in city bus service in Nashik has been removed marathi news
one obstacle in city bus service in Nashik has been removed marathi news

नाशिक : शहर बससेवा सुरू करताना सीएनजी इंधनपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या एक्सप्लोसिव्ह विभागाचा ‘ना हरकत’ दाखला आवश्यक असतो. केंद्राच्या या विभागाने हा दाखला दिल्याने सिन्नर फाटा व पंचवटी विभागातील फायर स्टेशनच्या जागेत सीएनटी स्टेशन उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळीत शहर बससेवेला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. 

‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ तत्त्वावर बससेवा

राज्य परिवहन महामंडळाऐवजी महापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ तत्त्वावर खासगीकरणातून बससेवा चालविली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ऑपरेटरही नियुक्त केले आहेत. दोनशे सीएनजी, पन्नास डिझेल बस पहिल्या टप्प्यात चालविल्या जाणार आहेत. सरकारी योजनेतून पन्नास इलेक्ट्रिकल बस चालविण्याचे नियोजन आहे. सीएनजी बससाठी इंधन पुरवठा करावा लागणार असल्याने त्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीसोबत करार करण्यात आला असून, पंधरा वर्षांसाठी विल्होळी येथे सीएनजी केंद्रासाठी जागा दिली जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक रोड विभागातील सिन्नर फाटा व पंचवटी विभागात के. के. महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या फायर स्टेशनच्या जागेत सीएनजी स्टेशन उभारले जाणार आहे.

टप्प्याटप्प्याने सीएनसी बस रस्त्यावर

सीएनजी स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या एक्सप्लोसिव्ह विभागाची मान्यता मिळणे आवश्यक असते. ती मान्यता देण्यात आल्याने सीएनजी स्टेशन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टप्प्याटप्प्याने सीएनसी बस पहिल्यांदा रस्त्यावर उतरविल्या जाणार आहेत. साधारणतः दिवाळीत शहर बस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबरअखेर पूर्ण क्षमेतेने बस चालविण्याचे नियोजन आहे. 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com