कांदा दरात घसरण सुरूच..! 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 24 January 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी विंचूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांच्याकडे निर्यातबंदी आणि साठवणूक मर्यादा उठवावी, यासाठी साकडे घातले. मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने कांद्याच्या दरात रोज घसरण दिसत आहे. आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी 1500, सरासरी तीन हजार 325, तर तीन हजार 815 रुपये भाव मिळाला.

नाशिक : येथील बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी तीन हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, तर 22 जानेवारीच्या तुलनेत कांदा दरात प्रतिक्विंटल 300 रुपयांची घसरण झाली. गुरुवारी देशातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे बाजारभावात सातत्याने कांदा दरात घसरण सुरू आहे.

लासलगावला 3300 रुपये प्रतिक्विंटल भाव 

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवून आणि कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत, यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार भारती पवार यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्यातबंदी आणि कांदा साठवणुकीवर असलेली मर्यादा उठवण्याबाबत पत्रव्यवहार केला.

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी विंचूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांच्याकडे निर्यातबंदी आणि साठवणूक मर्यादा उठवावी, यासाठी साकडे घातले. मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने कांद्याच्या दरात रोज घसरण दिसत आहे. आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी 1500, सरासरी तीन हजार 325, तर तीन हजार 815 रुपये भाव मिळाला

क्लिक करा > PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion prices decreased lasalgaon Nashik Marathi News