कांदा निर्यातबंदी उठवा.. बच्चू कडूंना साकडे 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

राज्यातील कांदा उत्पादकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे निर्यातबंदी उठविण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही राज्यमंत्र्यांनी दिली. त्या वेळी कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासमवेत कांदा उत्पादकांची बैठक घेण्यात यावी, अशी विनंती त्यांना करण्यात आल्याची माहिती कुबेर जाधव यांनी दिली. 

नाशिक : कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे साकडे रविवारी (ता. 9) अमरावती येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांना जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी घातले. कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. 10) महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

विभागीय आयुक्तालयावर आज मोर्चा 

राज्यमंत्र्यांना संघटनेतर्फे कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, बंटी पाटील, अनिल वाघ, विवेक देशमुख यांनी निवेदन दिले. या वेळी राज्यातील कांदा उत्पादकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे निर्यातबंदी उठविण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही राज्यमंत्र्यांनी दिली. त्या वेळी कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासमवेत कांदा उत्पादकांची बैठक घेण्यात यावी, अशी विनंती त्यांना करण्यात आल्याची माहिती कुबेर जाधव यांनी दिली. 

 PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!
 

आंदोलनाची ठिणगी 
कांद्याचे भाव कोसळूनही निर्यातबंदी उठवली जात नसल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रोष आळवण्यासाठी आंदोलनाची ठिणगी टाकली आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लिलाव बंद पाडण्यापासून ते "शोले' स्टाइल आंदोलनापर्यंतचा मार्ग शेतकऱ्यांना स्वीकारला. विभागीय आयुक्तालयावरील मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी म्हटले आहे.

मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion trader Request for Onion export ban to Bachhu Kadu