'हे तर बिटको हॉस्पिटलला उशिरा सुचलेले शहाणपण...!' मनसे व शिवसेनेकडून आरोप; पाहा व्हिडिओ

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Friday, 11 September 2020

महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सुविधा नाही. त्यामुळे रुग्णालयातील कोविड सेंटरजवळच आता ऑक्सिजन टाकी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 'प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण' अशा शब्दात पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे स्वागत केले. 

नाशिक : (नाशिक रोड) येथील महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सुविधा नाही. त्यामुळे रुग्णालयातील कोविड सेंटरजवळच आता ऑक्सिजन टाकी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 'प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण' अशा शब्दात पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे स्वागत केले. 

हेही वाचा > आश्चर्यंच! चोवीस तासांत एकाच लॅबमध्ये आला धक्कादायक रिपोर्ट; रुग्णाने सांगितली आपबिती

तर काही जीव वाचले असते...

बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या नळकांड्या पंक्चर असल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. बिटको हॉस्पिटलमध्ये शेकडो लोक उपचाराला येतात. मात्र येथे ऑक्सिजनची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागते. ही गैरसोय विचारात घेऊन प्रशासनाने अत्यवस्थ लोकांच्या सोयीसाठी ऑक्सिजन टॅंक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, रुग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन टँक खोदण्याचा घेतलेला निर्णय चांगला असला तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. आधीच ही सोय केली असती, तर काही जीव वाचले असते, अशी टीका माजी नगरसेवक व मनसेचे कार्यकर्ते अस्लम मनियार आणि श्‍याम गोहाड यांनी केली आहे. 

हेही वाचा > नवनियुक्त आयुक्त दीपक पांडेंपुढे आव्हान! लाच स्वीकारताना पोलीस हवालदारावर एंटी करप्शनची कारवाई

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen tank work to be done at Bitco Hospital nashik marathi news