'मुंबई विभागात पास, भुसावळ विभागात का नाही?' ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांचा सवाल

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Friday, 18 September 2020

दैनंदिन प्रवास करण्यासाठी मुंबई विभागात इगतपुरी ते मुंबई पास देणे सुरू असून, भुसावळ विभागात पास का दिले जात नाहीत, असा सवाल प्रवासी संघटनांनी विचारला आहे. दरम्यान, रेल्वे विभागाने पास सुरू केले नसल्याचा निर्वाळा मुंबईच्या जनसंपर्क विभागाने दिला असून, देऊ केलेल्या पासची आम्ही चौकशी करीत असल्याचे मुंबईच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. 

नाशिक : (नाशिक रोड) सध्या मनमाड, नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दैनंदिन प्रवास करण्यासाठी मुंबई विभागात इगतपुरी ते मुंबई पास देणे सुरू असून, भुसावळ विभागात पास का दिले जात नाहीत, असा सवाल प्रवासी संघटनांनी विचारला आहे. दरम्यान, रेल्वे विभागाने पास सुरू केले नसल्याचा निर्वाळा मुंबईच्या जनसंपर्क विभागाने दिला असून, देऊ केलेल्या पासची आम्ही चौकशी करीत असल्याचे मुंबईच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. 

पास सोशल मीडियावर व्हायरल

लॉकडाउननंतर मुंबईला जाणारी मनमाड-नाशिक-मुंबई रेल्वे चाकरमानी व व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आली. मात्र, सर्वच गाड्यांना आरक्षण केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, असा नियम रेल्वेने घालून दिला आहे. मात्र, मनमाडपासून प्रवास करणारे नियमित चाकरमानी व प्रवासी संघटनांनी निवेदनाद्वारे पासधारकांना यातून सूट द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, रेल्वेने अजून ही मागणी मान्य केलेली नाही. दरम्यान, मुंबई विभागाने इगतपुरी ते मुंबई पास एका प्रवाशाला जारी केला आहे. मुंबई विभागात हा पास जारी केलेला असताना, भुसावळ विभागात प्रवाशांना पास का दिला जात नाही, असा सवाल प्रवासी संघटनेचे गुरमितसिंग रावल यांनी उपस्थित केला आहे. हा पास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

मुंबई जनसंपर्क विभागाशी ‘सकाळ’ने संबंधित पासची चौकशी केली असता सबंध रेल्वे विभागात कुठेही पास जारी करण्यात आलेले नसून जारी करण्यात आलेल्या पासची आम्ही चौकशी करीत आहोत, असे जनसंपर्क अधिकारी पाटील यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pass in Mumbai division, why not in Bhusawal division, question of servants nashik marathi news