अखेर कोरोनाबाधित मृतदेहांची हेळसांड थांबली; अंत्यसंस्करासाठी 'वेटिंग'च्या समस्येला पूर्णविराम

दत्ता जाधव 
Sunday, 13 September 2020

कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढली होती. परिणामी, काही दिवसांपूर्वी शंभराहून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर असल्याची नामुष्की ओढावली होती.

जुने नाशिक : कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढली होती. परिणामी, काही दिवसांपूर्वी शंभराहून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर असल्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून वेटिंगवरील मृताच्या अंत्यसंस्करासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नातेवाइकांवर येत होती.

परवानगी मिळाल्याने दिलासा

कोरोनाबाधितांवर पारंपरिक पद्धतीने अंतिम संस्कार करण्याची परवानगी अमरधाममधील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे मृतदेह अंतिम संस्कारासाठी प्रतीक्षेत ठेवण्याच्या समस्येला पूर्णविराम मिळाला आहे. आठवडाभरापासून ‘नो वेटिंग’ची स्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापुर्वी गॅस किंवा विद्युत दाहिनीतच अंत्यसंस्कार करावे लागत. एक मृतदेहास सुमारे दोन तास लागत होते. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागत. अंत्यविधीसाठी येणारे नातेवाईक आणि अमरधाममधील कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. मात्र गुरुवार (ता.३)पासून पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता चितेवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

प्रतीक्षा संपली

पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारास सुरवात झाल्यापासून आठ दिवसांत सुमारे शंभर ते दीडशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही दाहिनी आणि पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या अंत्यसंस्कारामुळे पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करताना कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, फेस मास्क, हॅन्ड ग्लोज, प्लॅस्टिक अॅपरॉनचा पुरवठा केला जातो. ही सगळी खबरदारी घेऊनच कर्मचारी पुढील विधी करत आहेत. या सर्व वस्तू ‘यूज अँड थ्रो’ पद्धतीने वापरले जात असल्याची माहिती देण्यात आली.  
 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन- रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission to perform funeral in the traditional manner nashik marathi news