प्लेटिंग उद्योग संकटावर मार्ग काढण्याचे प्रयत्न! ‘एमपीसीबी’कडून गोदावरी प्रदूषणाची पाहणी

सतीश निकुंभ
Sunday, 18 October 2020

गेल्या महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने ९० पेक्षा अधिक प्लेटिंग उद्योगांवर ते नदी प्रदूषित करत असल्याचा ठपका ठेवत कारवाई केली. त्यानंतर उद्योगातील वीज, पाणी बंद करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना रोखत सातपूरला उद्योग संघटनांनी आंदोलन केले होते.

नाशिक/सातपूर : प्लेटिंग उद्योगावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर राजकीय हास्तक्षेपमुळे पुढील आदेश येईपर्यंत कारवाई स्थगितीचे आदेश प्राप्त झाले होते. याप्रकरणी ‘एमपीसीबी’चे वरिष्ठ अधिकारी सुपाते शुक्रवारी (ता. १६) नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह प्लेटिंग उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. 

गेल्या महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने ९० पेक्षा अधिक प्लेटिंग उद्योगांवर ते नदी प्रदूषित करत असल्याचा ठपका ठेवत कारवाई केली. त्यानंतर उद्योगातील वीज, पाणी बंद करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना रोखत सातपूरला उद्योग संघटनांनी आंदोलन केले. याची दखल घेऊन खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याने ‘एमपीसीबी’ने मंत्रालयातून स्थगितीचा आदेश दिला होता. पर्यावरण संस्थांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा देत प्लेटिंग उद्योगाच्या आमिषाला बळी न पडता गोदामाई प्रदूषित होणार नाही, याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ‘एमपीसीबी’चे मंत्रालयातील वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक अधिकारी अमर सुपाते, प्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे नाशिकमध्ये दाखल झाले. प्लेटिंग उद्योग संघटनेचे पदाधिकारी समीर पटवा, महापालिका ड्रेनेज विभागातील उपअभियंता नितीन राजपूत यांच्यासमवेत सातपूर, अंबडमध्ये तसेच महापालिकेच्या गंगापूर व टाकळी येथील एसटीपी प्रकल्पांचीही पाहणी केली.

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plating industry crisis nashik marathi news