esakal | "अगर मैने आपकी प्याज खाई है, तो उसकी इज्जत रखनी चाहिए ना?" मोदींचा कांद्यावरील तो VIDEO व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

modi and onion.jpg

आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला, तेव्हा या सभांतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक वारंवार ऐकत त्याची चर्चा करीत आहेत. काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी..पाहा...

"अगर मैने आपकी प्याज खाई है, तो उसकी इज्जत रखनी चाहिए ना?" मोदींचा कांद्यावरील तो VIDEO व्हायरल

sakal_logo
By
संपत देवगिरे

नाशिक : आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला, तेव्हा या सभांतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक वारंवार ऐकत त्याची चर्चा करीत आहेत. काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी..पाहा...

मोदींचा कांद्यावरील तो VIDEO व्हायरल

केंद्रात 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर जिथे जिथे निवडणुका होत, तिथे भाजपच्या सभा गाजत, त्या स्टारप्रचारक नरेंद्र मोदी यांच्याच. त्यामुळे सप्टेबर 2015 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या सभांतून मतदारांवर मोदींच्या भाषणांची मोहिनी होतीच. या वेळी झालेल्या दौऱ्यात त्यांनी दोंडाईचा येथे सभा घेतली होती "हम तो आप ही के यहॉं से जो आती थी प्याज, उसी पे गुजारा करते थे। जिन किसानो ने बचपन से मुझे जो प्याज खिलाई है, उन किसानो का भला करने के लिए दिल्ली मे बैठी हुई सरकार कभी कोई कमी नही रखेगी  पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते. याच शब्दांवर उपस्थित शेतकऱ्यांनी शिट्या, टाळ्यांचा गजर केला होता, मतेदेखील दिली होती.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

मोदीं त्यांच्या खास शैलीत मने जिंकतात तेव्हा...

सध्या सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन करीत आहे. मात्र स्थिती अशी की जणू त्यांना कोणी वालीच नाही. एव्हढेच काय, गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकीत पिंपळगाव बसवंत हे कांदा उत्पादनाचे केंद्र असलेल्या गावात झालेल्या सभेतदेखील त्यांनी हेच मुद्दे मांडले होते. त्यामुळे या सबेची तीन मिनीटांची व्हिडिओ क्लीप चांगलीच व्हायरल होत आहे. शेतकरी, युवक सगळ्यांत तिची चांगलीच चर्चा आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश