परिसरात तलवारी मिरवणाऱ्यांना घडली 'अशी' अद्दल की त्यांची मस्तीच उतरली..!

cidco police punishment.jpg
cidco police punishment.jpg

नाशिक/सिडको : चुंचाळे संकुल, संजीवनगर परिसरातील चारचाकी व रिक्षांच्या काचांची तोडफोड करत तलवारी मिरवणाऱ्या चारही दहशतखोरांची मस्ती उतरविण्यासाठी पोलिसांकडून त्यांना उठा-बश्‍या काढायला लावत त्यांना संबंधित परिसरातून मिरविण्यात आले. 

दहशतखोरांवर पोलिसांची कारवाई 
संजीवनगर, चुंचाळे परिसरात संशयित अक्षय जाधव (वय 23, वरचे चुंचाळे, अंबड), शैलेश माळी (वय 24, योगेश्‍वर विहार, वावरेनगर, नवीन नाशिक), इंद्रजित खुराणा (वय 21, त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक), शुभम अरगडे (वय 23, रा. रामकृष्णनगर, अंबड, नाशिक) यांनी मद्यधुंद अवस्थेत दहशत पसरविण्याच्या उद्देशाने परिसरातील घरांबाहेरील गाड्यांची तोडफोड केली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव, गुन्हे शाखा उपनिरीक्षक राकेश शेवाळे, हेमंत आहेर, अविनाश देवरे, भास्कर मल्ले, मारुती गायकवाड, चंद्रकांत गवळी, धनंजय उबाळे, मनोहर कोळी, दीपक वाणी, प्रमोद काशिद, संभाजी जाधव यांच्या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवली.

संबंधित संशयितांनी संजीवनगर व चुंचाळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत पसरविण्याचे काम केले होते. त्यांची दहशत कमी होण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांनी चारही संशयितांना परिसरातून फिरवत नागरिकांच्या मनातील दहशत कमी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com