स्मार्ट रोडच्या कामाचा व्यावसायिकांना त्रास नको.. 

smart road 1.jpg
smart road 1.jpg

नाशिक : धुमाळ पॉइंट ते नेहरू चौक स्मार्ट रोड कामाबाबत सराफ बाजार, मेन रोड भागातील व्यावसायिकांची बैठक कापड बाजार येथील विठ्ठल मंदिरात झाली. स्मार्ट रोडच्या कामास विरोध नाही, परंतु कामे करताना व्यावसायिकांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. 

धुमाळ पॉइंट-नेहरू चौक प्रस्तावित कामाबाबत बैठक 

महापालिकेकडून धुमाळ पॉइंट ते नेहरू चौकदरम्यान स्मार्ट रोड प्रस्तावित आहे. या रोडलगत सराफ बाजार, जिजामाता रोड, सरस्वती लेन, हुंडीवाला लेन, दहीपूल परिसर असा विविध भाग आहे. स्मार्ट रोडचे काम झाल्यावर पावसाचे पाणी या भागात साचू नये याची काळजी घ्यावी. काम करताना येथील जुन्याजाणत्या नागरिकांकडून माहिती घ्यावी. या भागातील सरस्वती नाला प्रथम स्वच्छ करावा. स्मार्ट रोड झाल्यास परिसरात पूरस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. टप्प्याटप्प्याने कामे करावीत. व्यावसायिकांवर कामाचा परिणाम होणार नाही याची विशेष काळजी घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. या वेळी दिग्विजय कापडिया, चेतन राजापूरकर, नरेश पारख, अमर सोनवणे, प्रसाद चौधरी, गिरीश टकळे, राजेंद्र दिंडोरकर, श्रीकांत येवलेकर, हेमंत जगताप, बंडू गंगावणे आदी उपस्थित होते. 

सहा सदस्यीय समिती स्थापन 
व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची सहा सदस्यांची समिती बैठकीत स्थापन करण्यात आली. चेतन राजापूरकर, नितीन नांदोडीकर, कमलेश पारख, परेश सुंगधी, समीर गायधनी, राकेश मोगरे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आर्किटेक्‍ट योगेश कासार असतील. तीन महिने समिती परिसराचा सर्व्हे करून अहवाल तयार करेल. महापालिकेस तो सादर केला जाईल, त्यानुसार त्यांनी कामाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. अहवाल तयार झाल्यावर खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्त, संबंधित अधिकारी यांच्यासह बैठकही घेण्यात येणार असल्याची माहिती चेतन राजापूरकर यांनी दिली. 

बैठकीतील ठराव 
-सरस्वती नाल्याच्या स्वच्छतेस प्राधान्य देणे. 
-पूरस्थिती आटोक्‍यात येण्याबाबत आकलन करावे. 
-जुन्या इमारतींचे नुकसान झाल्यास भरपाई द्यावी. 
-त्याच्या बांधकामास त्वरित परवानगी द्यावी. 

रोडच्या कामाच्या वेळेचे बंधन असावे.
व्यवसायावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, स्मार्टसिटीच्या मागील कामाचा अनुभव बघता रोडच्या कामाच्या वेळेचे बंधन असावे. -दिग्विजय कापडिया 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com