"भाजप म्हणजे धर्मशाळा नाही!" राष्ट्रवादीचे अपूर्व हिरेंच्या भाजप प्रवेशाबाबत भाजप नेत्याचे उत्तर

प्रमोद दंडगव्हाळ
Wednesday, 27 January 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अपूर्व हिरे हे भाजप पक्षात जाणार असल्याच्या चर्चेबाबत दस्तरखुद्द अपूर्व हिरे यांनी नकार दिल्याचे वृत्त दैनिक सकाळ मध्ये छापून येताच भारतीय जनता पक्षाच्या गोटात एकच खळबळ उडाली.

सिडको (नाशिक) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अपूर्व हिरे हे भाजप पक्षात जाणार असल्याच्या चर्चेबाबत दस्तरखुद्द अपूर्व हिरे यांनी नकार दिल्याचे वृत्त दैनिक सकाळ मध्ये छापून येताच भारतीय जनता पक्षाच्या गोटात एकच खळबळ उडाली.

भाजप म्हणजे धर्मशाळा नाही. - प्रदीप पेशकार

भाजप म्हणजे धर्मशाळा नाही. कोणत्याही परीस्थितीत व कुणीही डॉ.अपुर्व हिरेंना पक्षात घेणार नाही. इतके हलक्यात घेऊ नये. जो पर्यंत आम्ही आहोत तो पर्यंत कोणीही हिरेंची वकीली करु नये. काही जुन्या स्वयंघोषित नेत्यांना दुसऱ्या पक्षातील लोक मोठे वाटत असतील त्यांनी खुशाल वकीली करावी परंतु अशांना आता पार्टी भिक घालणार नाही.अशा प्रकारचे संगीत भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचे नेते प्रदीप पेशकार यांनी दिली आहे.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

हिरेंचा पलटवारकडे उत्तर 
या वृत्तामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले होते. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडीचे नेते प्रदीप देशकर यांनी दैनिक सकाळशी बोलताना अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत तिखट प्रतिक्रिया दिली. आता यावर हिरे कशाप्रकारे पलटवार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradip Peshkar reply regarding entry of Apoorva Hiray nashik political marathi news