सभापतिपदाच्या निवडप्रक्रियेला आव्हान देण्याची तयारी.. शिवसेनेकडून वकिलांचे पॅनल 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 5 March 2020

शिवसेनेने भाजपच्या घटलेल्या तौलनिक संख्याबळाच्या आधारे एका अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. सदस्य नियुक्तीनंतर विभागीय आयुक्तांकडून 3 मार्चला सभापतिपदासाठी निवडणूक जाहीर केल्याने गटनेते शिंदे यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे धाव घेत तक्रार केली. त्या तक्रारीनुसार नगरविकास विभागाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देताना आयुक्तांकडून संख्याबळाचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविला. यादरम्यान निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिल्याने भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

नाशिक : महापालिकेतील सदस्य संख्येच्या आधारे स्थायी समितीमधील भारतीय जनता पक्षाचे तौलनिक संख्याबळ घटून शिवसेनेला एका अतिरिक्त जागेचा लाभ होऊ शकतो, असे आयुक्तांच्या कायदेशीर अहवालातून स्पष्ट होत आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने आयुक्तांकडून सादर केलेल्या वस्तुनिष्ठ अभिप्रायाच्या आधारे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकिलांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेला कायदेशीर सल्ला प्राप्त झाल्यानंतर स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडप्रक्रियेलाच आव्हान देण्याची तयारी केल्याने स्थायी समिती सभापतिपदावरून निर्माण झालेला कायदेशीर पेच लांबण्याची शक्‍यता आहे. 

न्यायालयानचे 6 मार्चला गुप्त पद्धतीने निवडणूक घेण्याचे निर्देश
महापालिकेत भाजपचे संख्याबळ दोनने घटून 64 पर्यंत आल्याने तौलनिक संख्याबळ घटले आहे. त्यामुळे स्थायी समितीवर भाजपचे नऊऐवजी आठ सदस्य नियुक्त करणे अपेक्षित होते. यासंदर्भात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना पत्र देऊन मागणी केली होती. मात्र महापौर कुलकर्णी यांनी स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या सदस्यांपैकी चार भाजपचे, दोन शिवसेनेचे, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याची नियुक्ती केली. शिवसेनेने भाजपच्या घटलेल्या तौलनिक संख्याबळाच्या आधारे एका अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. सदस्य नियुक्तीनंतर विभागीय आयुक्तांकडून 3 मार्चला सभापतिपदासाठी निवडणूक जाहीर केल्याने गटनेते शिंदे यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे धाव घेत तक्रार केली. त्या तक्रारीनुसार नगरविकास विभागाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देताना आयुक्तांकडून संख्याबळाचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविला. यादरम्यान निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिल्याने भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने 6 मार्चला गुप्त पद्धतीने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

न्यायालयात जाण्याची तयारी 
याचदरम्यान, आयुक्तांना शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेतला. त्यात 
2020 मधील तौलनिक संख्याबळाची माहिती दिल्याने या आधारे शिवसेनेने वकिलांचा सल्ला घेऊन विरोधात निकाल लागल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. 
हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prepare to challenge the selection process of the Chairperson of standing committee Nashik Marathi News