सार्वजनिक शौचायलयात चक्क तो सुध्दा तिच्या मागे-मागे गेला...अन् मग...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

दोन महिन्यांपासून पीडितेला फोन करून तो मैत्री करण्याचा प्रयत्न करीत होता. बुधवारी (ता. 27) मध्यरात्री त्याने मुलीला फोन केला. त्या वेळी तिने बाथरूमला जात असल्याचे सांगितले. ती सार्वजनिक शौचालयात गेली असता संशयित तिच्या मागे आला...अन् मग...

नाशिक : दोन महिन्यांपासून पीडितेला फोन करून तो मैत्री करण्याचा प्रयत्न करीत होता. बुधवारी (ता. 27) मध्यरात्री त्याने मुलीला फोन केला. त्या वेळी तिने बाथरूमला जात असल्याचे सांगितले. ती सार्वजनिक शौचालयात गेली असता संशयित तिच्या मागे आला...अन् मग...

असा घडला प्रकार

जेल रोडच्या कॅनॉल रोड परिसरातील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर संशयिताने बलात्कार केला. अनिल शर्मा (वय 21, रा. बालाजी स्वीट, जेल रोड, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित शर्मा दोन महिन्यांपासून पीडितेला फोन करून मैत्री करण्याचा प्रयत्न करीत होता. बुधवारी (ता. 27) मध्यरात्री संशयिताने पीडितेला फोन केला. त्या वेळी तिने बाथरूमला जात असल्याचे सांगितले. ती सार्वजनिक शौचालयात गेली असता संशयित तिच्या मागे आला व शौचालयात घुसून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत संशयिताविरोधांत पॉक्‍सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दुसरीकडे घडताएत विनयभंगाच्या घटना..नंदोई निघाला नराधम

पंचवटीतील कोशिरे मळ्यात संशयित नंदोईनेच विनयभंग केल्याचा प्रकार घडला. राजू शेलार (रा. कोशिरे मळा, हनुमानवाडी, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता. 28) पीडिता घरी असताना संशयिताने बळजबरीने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत घराबाहेर गेली तर पाहून घेतो, असा दम दिला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

महिलेचा विनयभंग..नातलगांना मारहाण
राजीवनगर झोपडपट्टी येथे महिलेचा विनयभंग करून तिच्या नातलगांना मारहाण केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक भालेराव, सुरेखा मोरे, भाऊसाहेब मोरे, प्रतीक मोरे (सर्व रा. राजीवनगर झोपडपट्टी) अशी संशयितांची नावे आहेत. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. 27) संशयितांनी पीडितेला मारहाण करीत विनयभंग केला. पीडितेच्या जाऊबाईचे मंगळसूत्राचे नुकसान केले. दोन ऍपेरिक्षांच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the public toilet Rape of a minor girl nashik crime marathi news