लाल कांद्याचे भाव ढासळले.. भावात चक्क 'इतकी' मोठी घसरण 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 एप्रिल 2020

मुंबईत चौदाशे रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. कोल्हापूरमध्ये 24 तासांत क्विंटलमागे पाचशे रुपयांनी भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकावा लागला. इतरत्र भाव स्थिर राहिले आहेत.

नाशिक : लॉकडाउनमध्ये गोणीऐवजी खुल्या पद्धतीने कांद्याचे लिलावाला सुरवात झाली. टोकन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. अशातच, देशांतर्गत आणि निर्यातीसाठी फारशी मागणी नसल्याने भावातील घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. लाल कांद्याचे भाव सरासरी 650 ते 850 रुपयांपर्यंत ढासळले आहेत. त्याचबरोबर उन्हाळी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. 

उन्हाळ कांद्याची आवक वाढत असताना मागणीचा प्रश्‍न
मनमाडमध्ये सर्वांत कमी म्हणजे 650 रुपये क्विंटल, तर सर्वाधिक एक हजार रुपये क्विंटल असा सरासरी भाव चांदवडमध्ये मंगळवारी (ता. 7) लाल कांद्याला मिळाला. लाल कांदा लासलगावमध्ये 800, पिंपळगावमध्ये 850, देवळ्यात 750, नाशिकमध्ये 900 रुपये क्विंटल भावाने विकला गेला. तसेच उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी येवल्यात 900, कळवणमध्ये एक हजार शंभर, नांदगावमध्ये 750, लासलगावमध्ये बाराशे, मनमाडमध्ये एक हजार 50, देवळ्यात एक हजार, पिंपळगावमध्ये 951 रुपये असा भाव निघाला. विशेष म्हणजे, उन्हाळ कांद्याची आवक वाढत असताना मागणीचा प्रश्‍न तयार झाल्याने शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी भावाने विक्री करावी लागत आहे. 

VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह? 

मुंबईत चौदाशेचा भाव 
मुंबईत चौदाशे रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. कोल्हापूरमध्ये 24 तासांत क्विंटलमागे पाचशे रुपयांनी भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकावा लागला. इतरत्र भाव स्थिर राहिले आहेत. क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये असा - औरंगाबाद- 700, सातारा- एक हजार 250, जळगाव- 525, पंढरपूर- 750, पुणे- एक हजार 450

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red onion prices fell Nashik marathi news