
नोव्हेंबर २०१८ मध्ये मंडळ गठित झाल्यापासून डॉ. कुचिक यांनी मुंबई, नाशिक आणि पुणे येथे सल्लागार मंडळाच्या बैठकी घेतल्या. कामगार व मालक प्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतले.
नाशिक : महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची ऑनलाइन बैठक नुकतीच झाली. बैठकीत औषध व औषधनिर्मिती उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनदराबाबत निर्णय घेण्यात आला, तसेच अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्स, विडी उद्योगातील कामगार, औषध विक्रीमधील सेल्स व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आय.टी. क्षेत्रातील कामगारांसाठी स्वतंत्र अनुसूचित उद्योग निर्माण करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला.
किमान वेतन सल्लागार मंडळ बैठकीत निर्णय
महाराष्ट्र राज्यातील विविध उद्योगांमधील कामगारांचे किमान वेतन दर किमान वेतन कायद्यानुसार निश्चित केले आहेत. किमान वेतनदराचे पुनर्निर्धारण करणे व किमान वेतनदराबाबत सरकारला सल्ला देणे, यासाठी सरकारने महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. रघुनाथ बबनराव कुचिक यांच्यावर सोपविण्यात आली. नोव्हेंबर २०१८ मध्ये मंडळ गठित झाल्यापासून डॉ. कुचिक यांनी मुंबई, नाशिक आणि पुणे येथे सल्लागार मंडळाच्या बैठकी घेतल्या. कामगार व मालक प्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतले.
हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ
० सल्लागार मंडळाने एकूण ६७ अनुसूचित उद्योगांपैकी २७ अनूसूचित उद्योगांतील किमान वेतनदराच्या पुनर्निर्धारणासाठी राज्य सरकारला शिफारस करण्यात आली.
० २७ अनुसूचित उद्योगापैकी सरकारने तीन अनुसूचित उद्योगातील किमान वेतनदराचे पुनर्निर्धारण करून अंतिम अधिसूचना जारी केली.
० कारखाने अधिनियमांतर्गत येणारा अविशिष्ट उद्योग, दुकाने व व्यापारी आस्थापना उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायतींच्या कामगारांच्या वेतनदरात वाढ झाली.
हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं