मराठी पाऊल पडते पुढे! साक्रीच्या दाम्पत्याचा गुजरातमध्ये डंका; दोघेही मंत्रालयाच्या सचिवपदी विराजमान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

धुळ्यातील साक्रीच्या तोरवणे दाम्पत्यांचा गौरव फक्त साक्रीसाठीच नव्हे तर अवघ्या मराठी माणसांसाठी हा बहुमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठी भूमीपुत्रांनी आतापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करुन कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला आहे. यातून अनेक जणांनी महाराष्ट्राचा विशेषत: मराठी माणसाचा लौकीक सातासमुद्रापार नेला आहे. त्यात आणखी एका गौरवाची भर पडली आहे.

नाशिक / साक्री : धुळ्यातील साक्रीच्या तोरवणे दाम्पत्यांचा गौरव फक्त साक्रीसाठीच नव्हे तर अवघ्या मराठी माणसांसाठी हा बहुमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठी भूमीपुत्रांनी आतापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करुन कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला आहे. यातून अनेक जणांनी महाराष्ट्राचा विशेषत: मराठी माणसाचा लौकीक सातासमुद्रापार नेला आहे. त्यात आणखी एका गौरवाची भर पडली आहे. 

साक्रीच्या दाम्पत्याचा गुजरातमध्ये डंका!

धुळ्यातील बेहेड (ता. साक्री) येथील भारतीय प्रशासन सेवेतील मिलिंद तोरवणे व भारतीय पोलिस सेवेतील त्यांची पत्नी निपुणा तोरवणे गुजरात सरकारच्या अर्थ व गृह मंत्रालयाच्या सचिवपदी विराजमान झाले आहेत. मिलिंद तोरवणे यांच्या पत्नी निपुणा यांनी कच्छ येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नर्मदा, पोरबंदर, दहारे, राजपिपला व वलसाड येथे पोलिस अधीक्षक, सुरत शहराच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तसेच अहमदाबादच्या साहाय्यक पोलिस आयुक्त, अशी पदे भूषविली आहेत. त्यांची नुकतीच गुजरातच्या गृह विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली. त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'राष्ट्रपती पदक, तसेच महिला आयोगाच्या 'तेजस्विनी' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विशेष गौरवाची बाब म्हणजे निपुणा तोरवणे गुजरातमधील भारतीय पोलिस प्रशासनातील पहिल्या महिला पोलिस अधिकारी ठरल्या आहेत. पुढील काळात साक्री तालुक्याच्या विकासासाठी, तरुणांसाठी योगदान देणार असल्याचे तोरवणे यांनी सांगितले.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakri couple became home secretary gujrat nashik marathi news