andolan31.jpg
andolan31.jpg

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस आक्रमक! दिवसभर सत्याग्रह आंदोलन; पाहा VIDEO

नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधत शनिवारी (ता. 31) काँग्रेस पक्षातर्फे देशभरात किसान अधिकार दिवस पाळण्यात आला. त्याला पाठिंबा म्हणून महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस कमिटीसमोर दिवसभर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 

शेतकरीविरोधी कायदे मागे घ्या...

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी व कष्टकरी धोरणा विरोधात काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनास आजपासून सुरवात झाली. त्याला पाठिंबा म्हणून काँग्रेस कमिटीच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी दहा ते दुपारी चार यावेळेत हे आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, नगरसेविका आशा तडवी, सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर, प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण धोत्रे, आर. आर. पाटील, बबलू खैरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com