'ऑनलाइन परीक्षेसाठी सेतू सुविधा, आपले सरकार केंद्रांची सहाय्यता घेऊ' - उदय सामंत

अरुण मलाणी
Sunday, 20 September 2020

यानंतरही परीक्षा न दिलेल्‍या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देण्याचा पर्याय असेल. सुमारे ३८ हजार विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देतील, असा अंदाज असून, त्‍यानुसार विद्यापीठाने नियोजन आखले असल्‍याचे सांगितले. परीक्षेत वस्‍तूनिष्ठ, बहुपर्यायी स्‍वरूपाचे प्रश्‍न विचारले जातील. पन्नासपैकी तीस प्रश्‍न सोडविणे बंधनकारक असेल.

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या अंतिम वर्ष परीक्षेला १ लाख ४१ हजार विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. यापैंकी सुमारे ३८ हजार विद्यार्थी ऑफलाइन स्‍वरूपात परीक्षा देतील. ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्‍यभरातील सेतू सुविधा तसेच आपले सरकार केंद्र उपलब्‍ध करून देण्यासंदर्भात विचार केला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता.२०) दिली. 

पन्नासपैकी तीस प्रश्‍न सोडविणे बंधनकारक

नाशिक दौऱ्यावर असलेल्‍या श्री. सामंत यांनी मुक्‍त विद्यापीठात आढावा बैठक घेतल्‍यानंतर झालेल्‍या पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. ई वायुनंदन श्री. सामंत म्‍हणाले, की मंगळवार (ता. २२) पर्यंत मुक्त विद्यापीठाच्‍या अंतिम वर्ष परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. तर ३० ऑक्‍टोबरपर्यंत अंतीम वर्षाच्‍या परीक्षा पार पडतील. विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन असे दोन्‍ही पर्याय उपलब्‍ध करून दिले जातील. प्रारंभी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ज्‍या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली नाही, त्‍यांना सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्राद्वारे परीक्षेचा विकल्‍प दिला जाईल. यानंतरही परीक्षा न दिलेल्‍या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देण्याचा पर्याय असेल. सुमारे ३८ हजार विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देतील, असा अंदाज असून, त्‍यानुसार विद्यापीठाने नियोजन आखले असल्‍याचे सांगितले. परीक्षेत वस्‍तूनिष्ठ, बहुपर्यायी स्‍वरूपाचे प्रश्‍न विचारले जातील. पन्नासपैकी तीस प्रश्‍न सोडविणे बंधनकारक असेल. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

मुक्‍त विद्यापीठाचे अभ्यासक्रम 
राज्‍य शासनामार्फत राबविण्याचा विचार 

केंद्र शासनाच्‍या अटी व शर्तींमुळे मुक्‍त विद्यापीठाचे कृषीविषयक अभ्यासक्रम बंद पडले आहेत. तसेच युजीसीकडूनही मुक्‍त विद्यापीठाच्‍या अभ्यासक्रम अडचणीत आले आहेत. यापार्श्र्वभुमीवर राज्‍य शासनाच्‍या माध्यमातून हे शिक्षणक्रम पुन्‍हा सुरू करता येतील का, यासंदर्भात विचार सुरू आहे. कुलगुरूंना यासंदर्भात प्रस्‍ताव सादर करण्याच्‍या सूचना केल्‍या असल्‍याचेही श्री. सामंत यांनी नमूद केले. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Setu facility for online exams, with the help our government center - uday samant nashik marathi news