esakal | भीषण! स्फोटात घर उद्‌ध्वस्त.. सिलिंडरचे अक्षरश: तुकडे
sakal

बोलून बातमी शोधा

gas cylinder spot.jpg

माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एका बंबाच्या मदतीने आग आटोक्‍यात आली. शेजारील घरांना आगीची थोडी झळ बसली. सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला. याबाबत निश्‍चित माहिती समजू शकली नाही.

भीषण! स्फोटात घर उद्‌ध्वस्त.. सिलिंडरचे अक्षरश: तुकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : शहरातील कुसुंबा रस्त्यावरील गणेशनगर भागातील असिमा शहेनशाह यांच्या घरातील वरच्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराचे पत्रे उडाले. स्फोट व आगीने घर, संसारोपयोगी वस्तू, फ्रीज, कपाट फुटले. भिंतीला तडे गेल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. . 

अशी घडली घटना...
माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एका बंबाच्या मदतीने आग आटोक्‍यात आली. शेजारील घरांना आगीची थोडी झळ बसली. सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला. याबाबत निश्‍चित माहिती समजू शकली नाही. शाह कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सिलिंडरचा नॉब लिक होता. त्यामुळे स्फोट झाला. यात सिलिंडरचे अक्षरश: तुकडे झाले. याउलट काहींच्या मतानुसार सिलिंडरजवळ काही जळत असावे किंवा घरातील शॉर्टसर्किटमुळे सिलिंडरला आग लागून स्फोट झाला असावा. या वेळी घरात खाली तिघे होते. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. घरातील सर्व सामानाच्या ठिकऱ्या उडाल्या. अग्निशमन दल व शहर पोलिसांनी आगीची नोंद केली आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ही घटना रविवारी (ता. 7) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.

हेही वाचा > धगधगते वास्तव...मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचली पण बॅंकांना सांगणार कोण?

हेही वाचा > संजय राऊत ऐकलतं का?...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं!'