विश्वासाला गेला तडा! भावाने जॉईंट अकाऊंट उघडताच बहिणीचा धक्कादायक कारनामा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

दोघा बहीणभावांनी बॅंकेत संयुक्त खाते (जॉईंट खाते) उघडले. त्यावेळी त्यांनी लॉकरची सुविधासुद्धा घेतली होती. यावेळी भावाने विश्वासाने बहिणीला लॉकरची चावी दिली होती. त्यानंतर बहिणीने बिनधास्त कशाचीही पर्वा न करता आपला प्रताप दाखविला. यामुळे भावाच्या विश्वासाला मात्र चांगलाच तडा गेला.

नाशिक : दोघा बहीणभावांनी बॅंकेत संयुक्त खाते (जॉईंट खाते) उघडले. त्यावेळी त्यांनी लॉकरची सुविधासुद्धा घेतली होती. यावेळी भावाने विश्वासाने बहिणीला लॉकरची चावी दिली होती. त्यानंतर बहिणीने बिनधास्त कशाचीही पर्वा न करता आपला प्रताप दाखविला. यामुळे भावाच्या विश्वासाला मात्र चांगलाच तडा गेला.

काय घडले नेमके?

आशिष चांदवडकर व वैशाली व्यवहारे हे नात्याने बहीणभाऊ आहेत. दोघांनी नाशिक मर्चंट को-ऑप. बँक, पंचवटी येथे संयुक्त खाते उघडले. त्यावेळी त्यांनी लॉकरची सुविधासुद्धा घेतली होती. आशिष चांदवडकर यांनी विश्वासाने वैशाली व्यवहारेकडे लॉकरची चावी दिली होती. आशिष चांदवडकर यांनी लॉकरमध्ये सोने व चांदीचे दागिने ठेवले होते. ही बाब वैशाली व्यवहारे हिला लॉकर उघडले असता समजली. तिने भाऊ आशिष चांदवडकर यांना काही न सांगता लॉकरमधून परस्पर दागिने लंपास करत आशिष चांदवडकर याचा विश्वासघात केला. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक यु. आर. गवळी करत आहेत.

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज

भावाला बँकेत संयुक्त खाते उघडणे पडले महागात

बँकेत संयुक्त खाते उघडून लॉकरमध्ये दागिने ठेवणे भावास महागात पडले असून बहिणीने परस्पर दागिने लंपास केल्याची घटना नाशिक मर्चंट को-ऑप. बँक, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी म्हसरुळमधील आशिष बाळासाहेब चांदवडकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मनमाड येथील संशयित वैशाली बाळासाहेब चांदवडकर ऊर्फ वैशाली प्रवीण व्यवहारे (वय ४७) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >  काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sister removed jewelry from the locker nashik marathi news