वयाची साठी!.. पण तरुणांनाही लाजवेल अशी यशस्वी घोडदौड!

बापूसाहेब वाघ : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

प्रबळ इच्छा असेल तर यश निश्चित मिळते. तरूण वर्गालाही लाजवेल असा नियमीत धावण्याचा सराव आहेर हे करतात. यापुर्वी ही अनेक मॅरेथॉनमध्ये वसंतराव आहेर यांनी सहभाग घेऊन यशाची घोडदौड सुरूच ठेवली. त्यामुळे उद्यानपंडित बरोबर मॅरेथॉन पंडितमुळे नाशिकचे भुषण, येवल्याची शान व मुखेड चा अभिमान त्यांना म्हणणे सार्थ ठरेल.

नाशिक : नाशिक रन मॅरेथॉन स्पर्धा २०२० शनिवारी नाशिकला उत्साहात पार पडल्या.  या स्पर्धेत  मुखेड ता.येवला येथील वसंतराव कचरू आहेर यांनी ५१ वर्षापुढील गटात दहा किमी मध्ये द्वितीय क्रमांक संपादन करून वयाच्या साठीत ही मॅरेथॉन स्पर्धा गाजवली आहे हे विशेष. त्यांची यशस्वी घोडदौड आजही वाखाणण्याजोगी आहे. 

यशाची घोडदौड सुरूच

प्रबळ इच्छा असेल तर यश निश्चित मिळते. तरूण वर्गालाही लाजवेल असा नियमीत धावण्याचा सराव आहेर हे करतात. यापुर्वी ही अनेक मॅरेथॉनमध्ये वसंतराव आहेर यांनी सहभाग घेऊन यशाची घोडदौड सुरूच ठेवली. त्यामुळे उद्यानपंडित बरोबर मॅरेथॉन पंडितमुळे नाशिकचे भुषण, येवल्याची शान व मुखेड चा अभिमान त्यांना म्हणणे सार्थ ठरेल. नाशिक रन मॅरेथॉन स्पर्धेत बॉश इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एन.बालकृष्णन,महापौर सतिश कुलकर्णी, नाशिक रनचे अध्यक्ष एच.एस.बँनर्जी, उपाध्यक्ष रमेश जी.आर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आहेर यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व पाच हजार रूपयाचा धनादेश देवून सन्मानित केले.

२०१३ मध्ये जो धावण्याचा स्पीड आजही...

महाराष्ट्र शासनाने वसंत आहेर यांना २००८ या वर्षात सेंद्रीय शेतीचा प्रयोग केल्याने उद्यानपंडित पुरस्कार प्रदान केला. त्यांनी आपल्या शेतात सध्या अनेक प्रकारच्या आंब्याची झाडे सेंद्रीय शेती पद्धतीने विकसित केली. त्यातुन दरवर्षाला चांगले उत्पादन घेतात.नाशिक शहर पोलीस आयुक्त आयोजीत नाशिक मॅरेथॉन २०१७ मध्ये वसंतराव आहेर यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी २१ किमी मध्ये प्रथम क्रमांक संपादन केला होता. याच मॅरेथॉन स्पर्धेत २०१६ ला प्रथम क्रमांक पटकाविला होता. ८ जानेवारी २०१७ रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजीत चौथी राष्ट्रीय व नववी राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेतही त्यांनी ४५ ते ५९ या वयोगटात दहा किमी मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता.या वर्षी ४५ ते ५९ हा वयोगट नसल्याने मविप्र मॅरेथॉनमध्ये सहभाग घेता आला नाही परंतु आपला मुलगा सागर आहेर यास प्रेरणा देवून वयोगट १८ ते २५ मध्ये २१ किमी मध्ये सहभागी केले. मुलानेही आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सातव्या राष्ट्रीय व बाराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉनमध्ये १२ वा क्रमांक मिळवून यशस्वी पदार्पण केले. पुढील वर्षी या स्पर्धेत एक ते पाच क्रमांकात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.यासाठी बाप- लेक दररोज पहाटे धावण्याचा सराव करत आहे. २०१३ मध्ये जो धावण्याचा टायमिंग होता तो आजही कायम असल्याचे आहेर यांनी सांगितले. पुढील वर्षी ६० वर्षापुढील गटात

नक्की बघा > VIDEO : काय म्हणावं आता! हिप्पी बहाद्दरांसाठी चक्क शाळेतच अवतरले केस कर्तनालय

प्रथम क्रमांकासाठी आतापासूनच तयारी

नाशिक मविप्र मॅरेथॉनमध्ये चार किमी धावायचे असल्याने प्रथम क्रमांक संपादन करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. नाशिक पाठोपाठ कोल्हापूर, नागपूर, पुणे,औरंगाबाद येथेही मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होवून यशस्वी व्हायचेच असा निर्धार आहे.

दररोज धावणे ही काळाची गरज
मॅरेथॉन स्पर्धेमुळे आपली गुणवत्ता सिद्ध करणे व धावण्याची कला विकसित करता येते. तरूण वर्गाने धावण्याचे महत्व जाणुन आपल्या आरोग्यासाठी तरी किमान दररोज धावणे ही काळाची गरज आहे.- वसंत आहेर (उद्यानपंडित व मॅरेथॉन पट्टु, मुखेड ता.येवला )

हेही बघा > PHOTO : धक्कादायक! यात्रेत चिमुरडी अचानक गायब...शोध घेतल्यावर धक्काच!

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixty years old man won second price in Nashik Marathon marathi News