जरा याद करो कुर्बानी.. जवानांच्या स्मारकासाठी नाशिकच्या शहिदांच्या अंगणाची माती

महेंद्र महाजन
Friday, 27 November 2020

पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैन्यदलातील जवानाच्या ‘शहीद स्मारक’साठी नाशिकमधील शहीद जवानांच्या घरची माती नुकतीच संगीतकार उमेश जाधव यांच्याकडे वीरपत्नीच्या हस्ते देण्यात आली.  

देवळाली कॅम्प (जि.नाशिक) : पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैन्यदलातील जवानाच्या ‘शहीद स्मारक’साठी नाशिकमधील शहीद जवानांच्या घरची माती नुकतीच संगीतकार उमेश जाधव यांच्याकडे वीरपत्नीच्या हस्ते देण्यात आली.  

जवानांच्या स्मारकासाठी नाशिकच्या शहिदांच्या अंगणाची माती 
भारतीय लष्कराच्या परवानगीने १ एप्रिल २०१९ ला बेंगळुरू येथून प्रवास सुरू केलेल्या उपक्रमासाठी देवळालीच्या दस्तगीर बाबा रोड परिसरात निवृत्त नायक दीपचंद व कॅप्टन आसाराम राठोड यांनी संयोजन केले होते.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

वीरपत्नींनी ओवाळत माती सुपूर्द केली

वीरपत्नी रेखा चौधरी, सुषमा मोरे, कल्पना रौंदळ, भारती चौधरी, भारती पगारे, रूपाली बच्छाव आदी त्यांच्या अंगणातील माती घेऊन या ठिकाणी  दाखल झाल्या होत्या. शहिदांच्या स्मृती मातीच्या रूपाने भाळी लावत त्या जमा करण्याचे काम  बेंगळुरू येथील संगीतकार उमेश जाधव करीत आहेत. यापूर्वी त्यांनी ९० शहीद जवानांच्या घरासमोरील माती लष्कराकडे दिली आहे. औरंगाबाद येथील वैजापूर  येथून ते लष्कराची छावणी असलेल्या देवळालीत आले होते. वीरपत्नींनी त्यांना ओवाळत त्यांच्याकडे माती सुपूर्द केली. पुढचा प्रवास सिल्वासा, गुजरातमार्गे उत्तर-पूर्व भारत असा करणार असून, दिल्ली येथे या प्रवासाची १ एप्रिल २०२१ ला सांगता होणार आहे.  

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soil of Nashik Martyrs soldiers memorial marathi news