पोलिसांचा सायरन वाजताच "त्यांची'' उडाली धांदल...नेमकं काय घडले?

mg road.jpg
mg road.jpg

नाशिक : पोलिसांचा सायरन वाजताच सुरु झाली पळापळ...दिसेल त्या रस्त्याने "त्यांची' उडाली धांदळ...असं नेमकं काय झालं? सगळेच झाले अचंबीत अन् त्यांच्या या निष्काळजीपणावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तर कलम 188 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

सायरन ऐकून एकच धावपळ

शहरातील एमजी रोडवरील दुकानांबाहेर गुरुवारी (ता. 28) सकाळपासूनच गर्दी, तसेच वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड दुकाने, सराफ बाजार, एमजी रोडवरील दुकाने सुरू झाली आहेत. एमजी रोडवरील इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मोबाईल साहित्याची दुकाने सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी होते आहे. दुकानदारांकडून ग्राहकांसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानांसमोर गर्दी झाल्याचे काळताच गुरुवारी (ता. 28) सरकारवाडा पोलिस सायरन वाजवतच एमजी रोडवर आले. सायरन ऐकून ग्राहकांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. पोलिसांनी ग्राहकांना सूचना देताना गर्दी न करण्याचे आवाहन केले. दुकानचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. दुकानासमोर ग्राहकांच्या गर्दीमध्ये सुरक्षित अंतर नसणे, ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझरचा वापर न करणे, दुकानदाराने मास्क न वापरणे यांसह अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. त्यानुसार पोलिसांनी सहा इलेक्‍ट्रॉनिक दुकानदारांविरोधात सरकारवाडा पोलिसांत कलम 188 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

दुकानदारांना ताकीद 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. पाचपेक्षा जास्त ग्राहक दुकानासमोर नसावेत, दुकानात येणाऱ्या ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना पोलिसांनी एमजी रोड, मेन रोड, रविवार कारंजा, या परिसरातील दुकानदारांना दिल्या. नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्याची ताकीदही पोलिसांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com