पुन्हा बहरतोय मजुरांचा बाजार! उद्योग, बांधकाम साइट्स सुरू झाल्याचा परिणाम

सतीश निकुंभ
Sunday, 25 October 2020

निमा, आयमासह इतर उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वयाने महाराष्ट्रातच नाही, तर देशात सर्वांत पहिले नाशिकमधील औद्योगिक वसाहतीचे चाके फिरू लागली. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्यातील उद्योगांची चाके वेगाने फिरू लागली आहेत. 

नाशिक : (सातपूर) अनलॉक प्रक्रियेनंतर कोरोना संकटाशी सामना करत नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती गजबजू लागल्या आहेत. बांधकाम व्यवसायालाही चालना मिळाल्याने दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर सातपूरमधील कामगारांचा बाजार पुन्हा बहरतानाचे सकारात्मक चित्र पहायला मिळत आहे. 

उद्योग, बांधकाम साइट्स सुरू झाल्याचा परिणाम 

कोरोना काळात औद्योगिक वसाहती बंद झाल्याने जिल्ह्यातीलच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील हातावरील पोट भरणाऱ्या मजुरांची हलाकीची स्थिती निर्माण झाली होती. आर्थिक संकटामुळे अनेक कुटुंबांत आत्महत्येच्या घटना समोर आल्या होत्या. यावर त्वरित मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निमा, आयमासह इतर उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वयाने महाराष्ट्रातच नाही, तर देशात सर्वांत पहिले नाशिकमधील औद्योगिक वसाहतीचे चाके फिरू लागली. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्यातील उद्योगांची चाके वेगाने फिरू लागली आहेत. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

दुसरीकडे बांधकाम व्यवसायालाही चालना मिळाल्याने पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जव्हार, मोखाडा यांसह परप्रांतीय कामगार भल्या पहाटे सातपूरकडे धाव घेत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सातपूरमधील श्रीराम चौक, महिंद्र सर्कल, कार्बन नाका, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमधील एक्सलो पॉइंट आदी परिसरात कामगारांचे बाजार पुन्हा गजबजू लागले आहेत.  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: start of industry, construction sites worker is back nashik marathi news