"संत तुकाराम नावाचा गैरवापर थांबवा;अन्यथा तीव्र आंदोलन" वारकरी महामंडळ शाखेचा इशारा

मोठाभाऊ पगार
Wednesday, 16 September 2020

अखंड भारतातील वारकरी संप्रदाय नाराज झाला असून, याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याबाबत संबंधितांवर त्वरित कारवाई होऊन उत्पादनावर बंदी घालावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वारकरी महामंडळातर्फे दिला आहे.

नाशिक / देवळा : अखंड भारतातील वारकरी संप्रदाय या कृत्यामुळे नाराज झाला असून, याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याबाबत संबंधितांवर त्वरित कारवाई होऊन उत्पादनावर बंदी घालावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वारकरी महामंडळातर्फे दिला आहे.

 ...यामुळे अखंड भारतातील वारकरी संप्रदाय नाराज

निवेदनात, वारकरी संप्रदायाची अस्मिता, महाराष्ट्र राज्याचे आराध्य स्थान असणारे राष्ट्रसंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावाने निझामाबादच्या एका पटेल नामक उत्पादकाने तुकाराम विडी नावाने उत्पादनास सुरवात केली आहे. त्यामुळे अखंड भारतातील वारकरी संप्रदाय नाराज झाला असून, याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याबाबत संबंधितांवर त्वरित कारवाई होऊन उत्पादनावर बंदी घालावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वारकरी महामंडळाचे राष्ट्राध्यक्ष आर. के. रांजणे, कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री, नाशिक जिल्हाध्यक्ष अण्णा महाराज हिसवळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बच्छाव यांनी दिला आहे. निवेदनावर देवळा तालुका वारकरी महामंडळाचे अध्यक्ष अविनाश महाजन, उपाध्यक्ष तात्याभाऊ सावंत, सचिव धर्मा सावंत, रामनाथ खैरनार, गोविंद पवार, विलास जोशी, दिनकर पगार, बाळासाहेब आहेर, मधुकर अहिरे, बापू शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

तीव्र आंदोलनाचा इशारा

संत तुकाराम महाराज यांच्या नावाने उत्पादित विडीवर बंदी आणावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा येथील महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ शाखेने दिला आहे. या वेळी तहसील कार्यालयात निवेदन दिले.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop the misuse of the name Sant Tukaram nashik marathi news