VIDEO : जेव्हा अवघ्या पंधरा दिवसांत कोरोनाला हरवणारा लढवय्या पोलीस अधिकारी परततो...शेजाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 28 एप्रिल 2020

जगभरात कोरोनामुळे दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाचे नाव ऐकून भल्या भल्यांचे हातपाय गारठतात. त्यात ठाणे जिल्ह्यातील एक वरिष्ठ पोलिस निरिक्षक पॉझिटिव्ह आढळले तेव्हा अगदी तसेच घडले. मात्र अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणा-या या अधिकाऱ्याने पंधरा दिवसांत कोरोनाला हरवले. ते जेव्हा उपचारानंतर बाहेर पडले तेव्हा त्यांचे अगदी विजयी वीरासारखेच स्वागत झाले.

नाशिक : जगभरात कोरोनामुळे दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाचे नाव ऐकून भल्या भल्यांचे हातपाय गारठतात. त्यात ठाणे जिल्ह्यातील एक वरिष्ठ पोलिस निरिक्षक पॉझिटिव्ह आढळले तेव्हा अगदी तसेच घडले. मात्र अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणा-या या अधिकाऱ्याने पंधरा दिवसांत कोरोनाला हरवले. ते जेव्हा उपचारानंतर बाहेर पडले तेव्हा त्यांचे अगदी विजयी वीरासारखेच स्वागत झाले. त्यांच्या निवासस्थानी तर शेकडोंची गर्दी झाली. रांगोळ्या, घोषणा, औक्षण करुन त्यांचे स्वागत हे सर्व पाहून त्यांनी कोरोनाला हरवले, मात्र या स्वागताने त्यांना रडवले.

आत्मविश्वासाच्या बळावर कोरोनावर मात
दोन आठवड्यांपूर्वी या पोलिस अधिकाऱ्याचा कोविड १९ विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सबंध पोलिस यंत्रणेलाच हादरा बसला होता. असा अहवाल आलेले ते पहिले वरिष्ठ अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार घेतला. अर्थात कोविड १९ विषाणूचा बंदोबस्त करतील असा उपचार नाहीच. मात्र आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हे सर्व उपचार घेत शंभर टक्के बरे झाल्याचे सिद्ध केले. दोन दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. सलग दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यावर सोमवारी(ता.२७) दुपारी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी दिली. 

भारत माता की जय अशा घोषणा देत केले स्वागत

हे अधिकारी रुग्णालयातून घरी परतत असतांना ठाणे येथे आनंदनगर नाक्यावर सर्व पोलिस कर्मचारी गुच्छ घेऊन त्यांच्या स्वागताला हजर होते. त्यांनी अतिशय उत्साहाने त्यांचे स्वागत केले. यावेळील बरे होऊन आलेले हे अधिकारी स्वतः सगळ्यांना सोशल डिस्टन्स विषयी वारंवार सुचना देत होते. त्यानंतर ते रहात असलेल्या ठिकाणी येण्यास त्यांना रात्रीचे नऊ वाजले होते. एव्हढा उशीर होऊन देखील सायंकाळ पासूनच येथील नागरीक त्यांच्या स्वागतासाठी तयारी करीत होते. नागरीकांनी परिसरातल्या रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. त्यांच्या स्वागताची वाक्ये रस्त्यावर रंगवली होती. जवळपास शंभर मीट लांबवरुनच त्यांना गर्दीमुळे घरी चालत जावे लागले. 

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

कोरोनाला सहज हरवले, मात्र शेजा-यांनी त्यांना जिंकले.
तेव्हा उत्साही शेजारी, नागरीक भारत माता की जय अशा घोषणा देत होते. हात जोडून शुभेच्छा देत होते. अनेक जण सेल्फी काढत होते. घरी गेल्यावर त्यांच्या पत्नींनी त्यांचे औक्षण केले. शेजारच्या अनेक भगिनी त्यांच्या स्वागतासाठी औक्षण करीत होते. हा उत्साह व प्रेम पाहून हे अधिकारी भारावून गेले. त्यांनी कोरोनाला सहज हरवले, मात्र शेजा-यांनी त्यांना जिंकले. ते आपल्या भावना नियंत्रीत करु शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. हात जोडून ते सगळ्यांचे आभार मानत होते. कोरोनावरील विजयाचे हे एक आगळे चित्र यावेळी पहायला मिळाले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the strength of confidence, the police officer won the battle against Corona virus nashik marathi news