traffic mohim 2.jpg
traffic mohim 2.jpg

"भाईला अडविणारा तू कोण?" असं म्हणत त्याने पोलीस हवालदाराची पकडली कॉलर ..


नाशिक : महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांचे योगदानही लक्षणीय आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस अहोरात्र मेहनत करत आहेत. स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पोलिसांकडून हे काम केले जात आहे.अशातच एक निंदनीय घटना समोर येते.

अशी घडली घटना

बॉइज टाउन स्कूलजवळील सिद्धार्थनगर येथे पोलिस हवालदारास शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गटऱ्या ऊर्फ सुनील गायकवाड (वय 26, रा. सिद्धार्थनगर) असे संशयिताचे नाव आहे. हवालदार विष्णू उगले यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. 27) मध्यरात्री पोलिस शिपाई ढगे यांच्यासमवेत ते रात्रपाळीच्या गस्तीवर असताना संशयित गटऱ्या संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्या वेळी हवालदार उगले यांनी त्यास हटकले असता, संशयिताने सिद्धार्थनगरच्या भाईला अडवितो, असे म्हणून त्यांची कॉलर पकडून दमदाटी-धक्काबुक्की केली. खाली पाडून हल्ला केला.

गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण

हवालदाराने संशयित गट्य्राला न जुमानता ताब्यात घेत त्याच्याकडून चॉपर जप्त केला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांचे योगदानही लक्षणीय आहे. मात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण होत असल्याचे समोर आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com