"आयुक्त माझे मित्र आहेत..तुमच्या मुलाला लगेच नोकरी लावतो"..

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 21 जानेवारी 2020

संगनमताने मजहर शेख यांना फोन करून महापालिकेचे आयुक्त माझे मित्र असून, तुमच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी आरोपींनी जून 2016 ते जुलै 2017 यादरम्यान मजहर शेख यांच्याकडून पाच लाख 87 हजार रुपये उकळले.

नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त मित्र असल्याचे सांगत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवित लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायालयाने तिघा आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावली. 

असा घडला प्रकार...

अजिम गुलाम शेख (रा. किस्मत रो-हाउस, पखाल रोड), जहीर बनेमिया शेख (रा. चित्तिया कॉलनी, वडाळा रोड), राहुल कैलास सहाणे (रा. आंबेडकर कॉलनी, रेडक्रॉस हॉस्पिटलच्या मागे, नाशिक) असे तिघा आरोपींची नावे आहेत. मजहर इस्माईल शेख (रा. वडाळा रोड) यांच्या फिर्यादीनुसार तिघा आरोपींनी संगनमताने मजहर शेख यांना फोन करून महापालिकेचे आयुक्त मित्र असून, तुमच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी आरोपींनी जून 2016 ते जुलै 2017 यादरम्यान मजहर शेख यांच्याकडून पाच लाख 87 हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैशांची मागणी केली असता, आरोपींनी ठार मारण्याची धमकी देत पैसे देण्यास नकार दिला होता. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक केतन राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दोषारोपपत्र सादर केले होते. 

हेही वाचा>  लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..

दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास 

संबंधित खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी.के.आर. टंडन यांच्यासमोर चालला. ऍड. श्रीमती सी. एस. पगारे, ऍड. एस. एम. वाकचौरे यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहिले. तीनही आरोपींविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्या. श्रीमती टंडन यांनी तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक महेश मोरे, महिला पोलिस व्ही. एम. सोनवणे यांनी पाठपुरावा केला.  

हेही वाचा>  PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspected gave Job snare at Nashik Crime Marathi News