कोरोना उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

आपल्या जिल्ह्यात 6 शासकीय रुग्णालयांसह एकूण 27 रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत. नागरिकांनी आपल्याला या योजनेची मदत लागणार नाही. यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे परंतु आपल्याला कोरोनाची बाधा झाल्यास वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहचून उपचार सुरू करावेत.

नाशिक : कोरोना महामारीचा सामना करत असतांना रुग्णावर होणारा खर्च कमी करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. योजनेसंदर्भात नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यासाठी चलतचित्र प्रणालीद्वारे आज जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी माहिती दिली. 

टेलिफोनिक इंटिमेशनची देखील सुविधा उपलब्ध

जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, राज्य शासनाच्या शासन निर्णय 23 मार्चनुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कोव्हीड 19 या आजाराचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. आपल्या जिल्ह्यात 6 शासकीय रुग्णालयांसह एकूण 27 रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत. नागरिकांनी आपल्याला या योजनेची मदत लागणार नाही. यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे परंतु आपल्याला कोरोनाची बाधा झाल्यास वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहचून उपचार सुरू करावेत. त्यासोबतच किमान कागदपत्रे ज्यामध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवून रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रक्रिया करण्यास सांगावे तसेच याबाबत टेलिफोनिक इंटिमेशनची देखील सुविधा उपलब्ध आहे. त्याचा वापर करण्यास रुग्णालय प्रशासनास सांगण्याचे आवाहन श्री. मांढरे यांनी यावेळी केले.

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

या योजनेसाठी यापूर्वीच उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी रुग्णांना मदत करत असल्याची ते वेळोवेळी खातरजमा करत आहेत. या योजनेसाठी पंकज दाभाडे यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. नागरिकांनी या योजनेबाबत काही अडचणी असल्यास श्री. दाभाडे यांना 9404594161 या क्रमांकावर संपर्क करण्याचे देखील आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take advantage of Mahatma Phule Jan Arogya Yojana - Suraj Mandhare nashik marathi news