पहाटेची वेळ.. महामार्गावर एक टॅंकर बेवारस स्थितीत...तपास घेताच सापडले घबाड!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

जळगाव-पारोळा महामार्गावर पहाटे डांबर भरलेला टॅंकर बेवारस स्थितीत मिळून आला.. आश्यर्याची बाब म्हणजे तो ट्रक डांबरानी जर जरी भरलेला असला तरीदेखील त्याच्या आत किंमती गोष्ट सापडण्याची शक्यता होती. ट्रकच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. रस्त्यावर हा टॅंकर बेवारस स्थितीत मिळून आल्याने चोरीचे गूढ वाढले आहे.

नाशिक / मालेगाव : जळगाव-पारोळा महामार्गावर पहाटे डांबर भरलेला टॅंकर बेवारस स्थितीत मिळून आला.. आश्यर्याची बाब म्हणजे तो ट्रक डांबरानी जर जरी भरलेला असला तरीदेखील त्याच्या आत किंमती गोष्ट सापडण्याची शक्यता होती. ट्रकच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. रस्त्यावर हा टॅंकर बेवारस स्थितीत मिळून आल्याने चोरीचे गूढ वाढले आहे.

काय घडले नेमके?
चिखलओहोळ शिवारात सफेद कार (एमएच 01, सीव्ही 9951)मधून आलेल्या चौघा संशयितांनी उत्तर प्रदेशातील नवनीत रोडलाइन्स कंपनीचा 20 लाखांचा टॅंकर (जीजे 06, बीटी 0327) चालकाला जबरदस्तीने खाली उतरवून पळवून नेला. चालक अवधेशकुमार सरोज (वय 32, रा. बहुरियापूर, उत्तर प्रदेश) धुळ्याला तक्रार देण्यासाठी गेला. धुळे पोलिसांनी त्याला तालुका पोलिस ठाण्याची हद्द असल्याने येथे पाठविले. रविवारी (ता. 21) सायंकाळी त्याच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चोरट्यांनी 20 लाखांचा टॅंकर, सात लाख 36 हजारांच्या डांबरासह चालकाच्या खिशातील तीन हजारांची रोकड व दोन मोबाईल असा साडेसत्तावीस लाखांचा ऐवज लुटून नेला. पारोळा महामार्गावर पहाटे डांबर भरलेला टॅंकर बेवारस स्थितीत मिळून आला. चोरटे कारसह फरारी झाले. ही कार मुंबई येथील खान टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सच्या नावाने नोंदणी केली आहे. तालुका पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. 

चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

चिखलओहोळ शिवारातून डांबर भरलेला टॅंकर, चालकाची रोकड, मोबाईल असा सुमारे साडेसत्तावीस लाखांचा ऐवज चोरीला गेला. जळगाव-पारोळा रस्त्यावर हा टॅंकर बेवारस स्थितीत मिळून आल्याने चोरीचे गूढ वाढले असून, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

हेही वाचा > भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग

नियामत बागेत दागिने लंपास 
मालेगाव : नियामत बाग स्लॉटर हाउसजवळील आसियाबेगम अजिर्जुर रहेमान (वय 40) यांचे घर उघडे असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील तीन लाख 12 हजार 300 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. आसियाबेगम यांची प्रकृती अचानक बिघडली. त्या घराला कुलूप न लावता हॉस्पिटलला गेल्या. ही संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. पवारवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tanker from Chikhalohol Shivar stolen nashik marathi news