थॅलेसेमियाग्रस्‍त प्रिया अडकली लग्‍नबंधनात..! अन्‍य रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण..

thalesemiya.jpg
thalesemiya.jpg

नाशिक : थॅलेसेमिया रुग्‍णाला दर महिन्‍यास रक्‍तपुरवठा करावा लागत असतो. त्यामुळे अशा रुग्‍णांचे लग्‍न होणे दुर्मिळ असते. परंतु नाशिकमध्ये थॅलेसेमियाग्रस्‍त प्रियाच्‍या लग्‍नसोहळ्याचे आशादायक दृश्य अनुभवायला मिळाले.

थॅलेसेमियाग्रस्‍त प्रिया अडकली लग्‍नबंधनात 
प्रियाचे पालक व नवरा त्र्यंबक काळे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होते आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी आणि स्माइल थॅलेसेमिया फाउंडेशन यांच्या सहाय्याने जनकल्याण रक्‍तपेढी येथे नवदांपत्यांचा अन्‍य थॅलेसेमिया रुग्ण व त्यांचे पालक यांच्या उपस्थितीत भेटवस्तू व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. प्रियाच्या पुढील वाटचालीसाठी तिला शिलाई मशिन भेटवस्तू म्हणून देण्यात आली. रविवारी (ता. २) प्रियाचा विवाह सोहळा पार पडला. या वेळी रोटरी क्‍लब ऑफ नाशिक गोदावरी, स्‍माइल थॅलेसेमिया फाउंडेशन, जनकल्‍याण रक्‍तपेढी यांच्‍यातर्फे नवजोडप्यास भावी वाटचालीसाठी शुभेच्‍छा देण्यात आल्या. 

देशातील चौथी, तर जिल्‍ह्यातील पहिली घटना
डॉ. संगीता लोढा यांच्या देखरेखीखाली गेल्या पंचवीस वर्षांपासून जनकल्याण रक्‍तपेढी येथे थॅलेसेमिया रुग्‍णांना दर महिन्याला रक्त चढविण्यात येते. प्रिया आणि त्र्यंबक काळे यांच्या लग्नाने अन्‍य थॅलेसेमिया रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. हा अनोखा विवाह सोहळा अनुभवताना उपस्‍थित सर्वांच्‍या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले होते. या अत्‍यंत दुर्मिळ विवाह समारंभास उपस्‍थित राहिल्‍याचे समाधानदेखील व्‍यक्‍त करण्यात आले. सोहळ्याप्रसंगी जनकल्याण रक्‍तपेढीचे अधिकारी, डॉ. संगीता लोढा, रोटरी क्लबचे अध्यक्ष रोहित सागोरे, रुपेश झटकारे, डॉ. आवेश पलोड, डॉ. प्रणिता गुजराथी, ओंकार महाले, जगदीश आचरा, पंकज अहिरराव आदी उपस्‍थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com