शिधापत्रिकेचा लाभ घेण्यात 'हा' जिल्हा आघाडीवर; तर नाशिक विभागात ७७ लाख शिधापत्रिका

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Saturday, 5 September 2020

लॉकडाउनच्या काळात अनेक लोकांना शिधापत्रिकाची मदत होऊन पुरेशा प्रमाणात अन्नधान्य मिळाले. रहिवासी पुराव्यासह नागरिकत्वाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकाला सध्या गरीब लोकांबरोबरच पांढरपेशा वर्गही प्राधान्य देत आहे. 

नाशिक : (नाशिक रोड) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांमध्ये ७७ लाख ६९ हजार ४२८ शिधापत्रिका आजपर्यंत वितरित झाल्या आहेत. धुळे जिल्हा शिधापत्रिकेचा लाभ घेण्यात आघाडीवर असून, त्यानंतर नाशिक, नगर, जळगाव व शेवटी नंदुरबारचा क्रमांक लागतो. 

जिल्ह्यांमध्ये ७७ लाख ६९ हजार ४२८ लोकांकडे शिधापत्रिका

धान्य घेण्यासह विविध शैक्षणिक फी, कल्याणकारी योजना, मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजना, शाळा, मतदान केंद्र, दाखले काढण्यासाठी विविध सवलतींमध्ये शिधापत्रिकाची आवश्यकता असते. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात, तहसीलदारांच्या देखरेखीखाली प्रत्येक तहसील कार्यालयात शिधापत्रिका वितरित करण्याचे काम चालते. नाशिक विभागातील वरील पाचही जिल्ह्यांमध्ये ७७ लाख ६९ हजार ४२८ लोकांकडे सध्या शिधापत्रिका आहेत. यात अंत्योदय, बीपीएल, एपीएल, केसरी व पिवळे असे विविध योजनांमधील शिधापत्रिका लोकांनी मिळविल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात अनेक लोकांना शिधापत्रिकाची मदत होऊन पुरेशा प्रमाणात अन्नधान्य मिळाले. रहिवासी पुराव्यासह नागरिकत्वाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकाला सध्या गरीब लोकांबरोबरच पांढरपेशा वर्गही प्राधान्य देत आहे. 

हेही वाचा > समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; आत्महत्या की घातपात?

शिधापत्रिकांची जिल्ह्यानुसार संख्या 

नाशिक : १२ लाख ३६ हजार ९५७ 
नगर : दहा लाख ४९ हजार ४९० 
जळगाव : नऊ लाख २६ हजार ११४ 
धुळे : ४२ लाख २३ हजार ३७० 
नंदुरबार : तीन लाख ३३ हजार ४९७ 
एकूण : ७७ लाख ६९ हजार ४२८  

हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are 77 lakh ration cards in Nashik division nashik marathi news