BREAKING : "नाशिक नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही भूकंप नाही"..अन् 'तो' ट्विटही काही वेळानंतर डिलीट 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

नाशिकसह महाराष्ट्रात कुठेही भूकंप झाला नसल्याची माहिती नाशिक मधील मेरीतील भूकंप मापन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एनसीएचतर्फे दुरुस्ती करण्यात आली असेल असेही स्पष्ट करण्यात आले.

नाशिक : नाशिकपासून 49 किलोमीटर अंतरावर भूकंप झाल्याची नोंद एनसीएच तर्फे करण्यात आली होती. प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यात कुठे ही भूकंप झालेला नाही.

मेरी भूकम्प मापन केंद्रची माहिती
नाशिकसह महाराष्ट्रात कुठेही भूकंप झाला नसल्याची माहिती नाशिक मधील मेरीतील भूकंप मापन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एनसीएचतर्फे दुरुस्ती करण्यात आली असेल असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, नाशिक-मनमाडमध्ये लासलगाव केंद्र दाखविण्यात आले होते. भारतीय हवामान विभाग मुंबईच्या उपसरव्यवस्थापकांनी भूकंपाचा ट्विटही केला होता, काही वेळाने त्यांनी तो डिलीट केला.

हेही वाचा > कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no earthquake anywhere in nashik and Maharashtra also nashik marathi news