गुन्हा नव्हे गैरसमजुतीतून फक्त घेराव; ‘ऍनिमल एम्ब्युलन्स'बाबत संस्थेकडून खुलासा

विनोद बेदरकर
Saturday, 3 October 2020

याप्रकरणी शरण फॉर ॲनिमल्स संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार गैरसमजुतीत झाला असून, यात कुठलाही गुन्हा दाखल नाही. उलट संस्था १२ वर्षांपासून मुक्या प्राण्यांचे संगोपन करण्याचे काम करते. लोकांच्या गैरसमजामुळे प्रकार घडल्याचे सांगितले.

नाशिक : (देवळाली कॅम्प) लॅम रोडला जनावरे पळविण्याच्या संशयाने नागरिकांनी घेराव घातलेल्या प्रकरणी हे संशयातून घडले असून, यात गुन्हा दाखल झालेला नाही. संबंधित लोक हे जनावरे पळविणारे नव्हे, तर अपघातग्रस्त पीडित मुक्या प्राण्यांवर उपचार व त्यांची काळजी घेणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी असल्याचे पुढे आले आहे. वाचा काय घडले?

असा आहे प्रकार

लॅम रोडला बुधवारी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. तेथे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यात, संबंधित लोक हे नाशिकच्या शरण फॉर अनिमल्स संस्थेशी संबंधित असल्याचे पुढे आले. चेतन उजागरे या व्यक्तीने दूरध्वनी करून माहिती दिल्यामुळेच संस्थेचे लोक घोडा व बैलाला नेण्यासाठी गेले होते. स्थानिक ग्रामस्थांना शरण संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर संशय आल्याने त्यातून गाडी अडविण्याचा प्रकार झाल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी शरण फॉर ॲनिमल्स संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार गैरसमजुतीत झाला असून, यात कुठलाही गुन्हा दाखल नाही. उलट संस्था १२ वर्षांपासून मुक्या प्राण्यांचे संगोपन करण्याचे काम करते. लोकांच्या गैरसमजामुळे प्रकार घडल्याचे सांगितले. पोलिसांनी संस्थेच्या कागदपत्रांची छाननी करून चौकशी केली. गावातील रामा निकम संस्थेत लोक पाठवून संस्थेच्या कामाची खात्री केली, असे संस्थेच्या अध्यक्षा शरण्या शेट्टी यांनी सांगितले.  

हेही वाचा > मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

हेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They were not animal abductors, the organization said nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: