१५० मीटरवर खोल पाण्यात रुतलेली 'ती' गोष्ट पाहताच ग्रामस्थांनाही धक्का; खुलासा होताच एकच आक्रोश

राजेंद्र अंकार
Monday, 14 September 2020

चांदोरी आपत्ती व्यवस्थान कक्षाच्या जीवरक्षक पथकाने जामनदीचे पात्र पिंजून काढले. गळ टाकून, साखळीने चिखल तुडवून व प्रसंगी सूर मारत खोल पाण्यात ही शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर रविवारी सकाळी आठला पुलापासून १५० मीटरवर खोल पाण्यात गाळात रुतलेली ती गोष्ट हाती लागली. आणि नातेवाइकांना शोक अनावर झाला होता.

नाशिक / सिन्नर : चांदोरी आपत्ती व्यवस्थान कक्षाच्या जीवरक्षक पथकाने जामनदीचे पात्र पिंजून काढले. गळ टाकून, साखळीने चिखल तुडवून व प्रसंगी सूर मारत खोल पाण्यात ही शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर रविवारी सकाळी आठला पुलापासून १५० मीटरवर खोल पाण्यात गाळात रुतलेली ती गोष्ट हाती लागली. आणि नातेवाइकांना शोक अनावर झाला होता.

काय घडले नेमके?

शुक्रवारी सायंकाळी कणकोरी येथील पुलावरून वेगाने पुराचे पाणी वाहत असताना अनिल भागवत याने दुचाकी घालत पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुचाकीसह तो नदीपात्रात ओढला गेला होता. रात्री अंधार व पाऊस सुरू असल्याने त्याला वाचविता आले नाही. शनिवारी (ता. १२) सकाळी त्याची मोटारसायकल मिळून आली होती. मात्र अनिल बेपत्ता होता. अखेर रविवारी सकाळी आठला पुलापासून १५० मीटरवर खोल पाण्यात गाळात रुतलेला मृतदेह हाती लागला. अनिलचा मृतदेह पाहून नातेवाइकांना शोक अनावर झाला होता. निऱ्हाळे येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

खोल पाण्यात शोधमोहीम 
चांदोरी आपत्ती व्यवस्थान कक्षाच्या जीवरक्षक पथकाचे प्रमुख सागर गडाख यांच्या नेतृत्वाखाली फकिरा धुळे, वैभव जमदाडे, किरण वाघ, शरद वायकंडे, विलास गडाख, विलास गांगुर्डे, सूरज पगारे, किरण बुरकुडे यांनी जामनदीचे पात्र पिंजून काढले. अनिलच्या शोधासाठी गळ टाकून, साखळीने चिखल तुडवून व प्रसंगी सूर मारत खोल पाण्यात ही शोधमोहीम राबविण्यात आली.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

तीस तासांनंतर अनिलचा मृतदेह पाण्याबाहेर 

शुक्रवारी (ता. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास कणकोरी (सिन्नर) येथे नदीच्या पुरात दुचाकीसह वाहून गेलेल्या अनिल नामदेव भागवत (वय ३३, रा. निऱ्हाळे) या तरुणाचा मृतदेह शोधण्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांना ३० तासांनंतर यश आले. रविवारी (ता. १३) सकाळी आठच्या सुमारास अनिलचा मृतदेह गाळात अडकलेला मिळून आला. 

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty hours later Search campaign completed nashik marathi news