क्लीनरला भोसकून रोकड लंपास करणारे तिघे अटकेत 

भाऊसाहेब गोसावी
Tuesday, 15 September 2020

 रात्री पावणेबाराच्या सुमारास मिर्ची हॉटेल सिग्नल परिसरात उभा असलेला ट्रकचा चालक सलमानला मागे घेण्यासाठी दिशा दाखवत होता. या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अमीर याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरवात केली. 

नाशिक / म्हसरूळ : ट्रक मागे घेण्यास चालकास मदत करणाऱ्या एका क्लीनरला किरकोळ कारणावरून तीन दुचाकीस्वारांनी वाद घालत चाकूने भोसकल्याची घटना रविवारी (ता. १३) रात्री घडली. संशयितांनी जखमी क्लीनरच्या खिशातील दहा हजारांची रोकड हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सोमवारी (ता. १४) तीन संशयितांना अटक केली. 

असा घडला प्रकार
नीलेश रणखांबे (वय २३, रा. वैभव पार्कमागे, इंदू लॉन्ससमोर, औरंगाबाद रोड), निसार पटेल (३४, नुरानी गल्ली, भारतनगर), मयूर निमसे (२८, विठ्ठल निवास, इंदू लॉन्ससमोर, औरंगाबाद रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. औरंगाबाद रोडवरील कैलासनगर परिसरात राहणारा अमीर फरीद खान (२०) क्लीनरचे काम करतो. रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास मिर्ची हॉटेल सिग्नल परिसरात उभा असलेला ट्रक (एमएच १५, जीव्ही ३६१३)चा चालक सलमानला मागे घेण्यासाठी दिशा दाखवत होता.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

काही तासांत संशयितांना बेड्या

या सुमारास दुचाकीवरून आलेल्या नीलेश रणखांबे, निसार पटेल आणि मयूर निमसे यांनी अमीर याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरवात केली. अमीरच्या पोटात एकाने चाकू भोसकून खिशातील दहा हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. आडगाव पोलिसांनी काही तासांत संशयितांना बेड्या ठोकल्या.  

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested for kill cleaner nashik marathi news