"ते" नकळत व्हायरल करायचे पोर्नोग्राफी व्हिडिओ...अचानक..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

अल्पवयीन मुला-मुलींचे अश्‍लील छायाचित्र, व्हिडिओ बघणे, बागळणे किंवा व्हायरल करणे हा गुन्हा असून, संशयितांविरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.  

नाशिक : अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ, त्यांचे छायाचित्र व्हायरल करणाऱ्या तिघांविरोधात सायबर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांतर्गत तिघा संशयितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना देण्यात आले होते.  

असा आहे प्रकार

दिवसेंदिवस बालकांचे अश्‍लील छायाचित्र काढणे, छायाचित्रण चित्रित करणे, व्हिडिओ बाळगणे किंवा त्यांचा प्रसार करणे याचे प्रमाण वाढते आहे. अल्पवयीन मुलामुलींवरील लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ, त्यांचे छायाचित्र व्हायरल करणाऱ्या खुशाल भाऊसाहेब पाटील (रा. श्रद्धाविहार, इंदिरानगर), आशुतोष रतनराव महात्मे (रा. लक्ष्मी बंगला, प्रोफेसर कॉलनी, मखमलाबाद रोड), शंकर कमानसिंग सोनार (रा. कांबळेवाडी, स्वारबाबानगर, सातपूर) या तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे संशयित पोर्नोग्राफी व्हिडिओ व्हायरल करत असल्याचे समोर आले आहे.

अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराबाबत कडक धोरण

केंद्र सरकारच्या दी नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ऍन्ड एक्‍सप्लोइटेड चिल्ड्रन (NCMEC) आणि नॅशन क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्याकडून अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराबाबत कडक धोरण राबविण्यात येत आहे. बालकांचे अश्‍लील छायाचित्र काढणे, छायाचित्रण चित्रित करणे, व्हिडिओ बाळगणे किंवा त्यांचा प्रसार करणे हा माहिती तंत्रज्ञान कायदा-2000, कलम 67 (ब) प्रमाणे गुन्हा आहे. या गुन्ह्यांतर्गत तिघा संशयितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना देण्यात आले होते. 

हेही वाचा>  PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

तिघांविरोधात गुन्हा दाखल

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक सायबर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केले आहेत. गुन्ह्याचा तपास सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत. अल्पवयीन मुला-मुलींचे अश्‍लील छायाचित्र, व्हिडिओ बघणे, बागळणे किंवा व्हायरल करणे हा गुन्हा असून, संशयितांविरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.  

हेही वाचा>  "माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा"..तिने नकार देताच.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three men arrested in pornography video case nashik crime marathi news