शेतात चोरी करणारे तीन भुरटे चोर गजाआड! हजारोंचा मुद्देमाल जप्त

three thieves arrested by police nashik marathi news
three thieves arrested by police nashik marathi news

नाशिक/नामपूर : शहरात होणाऱ्या वाहनचोऱ्या, घरफोडीच्या घटनांनंतर चोरट्यांनी शेतमाल व शेतीतील साहित्याला आपले लक्ष केले आहे. शेतातील शेतमाल तसेच साहित्याच्या चोरीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. साक्री रस्त्यालगत असणाऱ्या अजित खुटाडे यांच्या शेतात ठिबक सिंचनाच्या साहित्याच्या चोरी प्रकरणी तीन जणांविरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नामपूर येथील तीन आरोपी अटक

युवा शेतकरी अजीत खुटाडे यांनी आपल्या साक्री रस्त्यालगत असणाऱ्या शेतातून जैन कंपनीच्या  ठिबकच्या सुमारे १० बंडल नळीची चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार जायखेडा पोलिसांनी नामपूर येथील शरीफ निजाम शहा, रिक्षा चालक दिलीप रामदास भामरे, खामलोण ( ता बागलाण ) देवेंद्र धोंडगे यांना ताब्यात घेतले असून त्यांना सटाणा येथील न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले. चोरीच्या घटनेत वापरण्यात आलेली मालवाहु रिक्षा ( क्रमांक एमएच ४१ जी ५४०४ ) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तीनही संशयित आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ५६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. 

कांदा चोरीच्या घटना              

दोन दिवसांपूर्वी  येथील प्रगतशील शेतकरी तथा शिवछत्रपती सहकारी मंगल कार्यालयाचे माजी संचालक शशिकांत सावंत यांच्या शेताचे प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी उन्हाळ कांदा, ठिबकच्या नळ्या, पिस्टन नळ्या असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कांद्याचे भाव दिवसागणिक वाढत असताना कांदा चोरीच्या घटनांनी कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला  झाला आहे. त्यामुळे संशयित चोरटे, खबरी आदींच्या माध्यमातून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com